Ramularia collo-cygni
बुरशी
झाड वाढीच्या सुरवातीच्या काळात बुरशीचे संक्रमण होऊ शकते पण पहिली लक्षणे मात्र हंगामात उशीराच दिसतात. रोगाच्या सुरवातीच्या अवस्थेत छोटे, तपकिरी, बेढब "मिरीसारखे डाग" पानाच्या पात्यांवर किंवा पर्णकोषावर उमटतात. नंतर हे डाग मोठे होतात आणि १ ते ३ मि.मी.च्या आयताकृती, लालसर तपकिरी वाळलेल्या ठिपक्यात बदलतात. हे ठिपके पानांच्या शिरांनी सीमित असतात, पात्याच्या दोन्ही बाजुंना दिसतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर, हे ठिपके मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि मोठा गडद भाग तयार होतो तसेच पानाचे मोठे भाग वाळतात. पर्णकोष आणि कुसावरही लक्षणे दृष्य होतात. भिंगातुन पाहिले असता, पानांच्या खालच्या बाजुला पांढरे बुरशीचे पुंजके वाढताना दिसतात. पानाच्या नुकसानाने पानांची अकाली कूज होते तसेच उत्पन्नाचेही नुकसान होते.
रामुलारिया कोलो-सिग्नि विरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार आम्हाला माहिती नाहीत, माफ करा. ह्या रोगावरील काही उपाय आपल्याला माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आपल्या माहितीची वाट पहातोय.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ट्रायझोलवर आधारीत बुरशीनाशकांची फवारणी ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन केली जाऊ शकते आणि रोग ओळखला गेल्यानंतर उपचारात्मक पर्याय म्हणुनही केली जाऊ शकते. सध्या उपलब्ध असलेल्या बिजोपचारांचा बुरशीवर अत्यंत कमी प्रभाव पडतो.
रामुलारिया कोलो-सिग्नी नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. बुरशी, बियाणे, स्वयंभू रोपे, इतर तृणधान्याचे यजमान किंवा जमिनीतील झाडांच्या अवशेषात रहाते. बुरशीचा प्रसार वारा आणि पावसाने होतो. जरी संक्रमण हे झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकत असले तरी लक्षणे मात्र हंगामात उशीराच म्हणजे प्रजोत्पादन वाढ बदलाच्या वेळीच दिसतात. झाडाच्या पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन बुरशी आत शिरते आणि आतील भागात वस्ती करुन झाडास विषारी द्रव्य उत्पादन करते. बुरशीला ऊगवणीसाठी तसेच विकसनासाठी पानांच्या पृष्ठभागावर (पावसानंतर किंवा दव पडल्यानंतर) ओलावा आवश्यक असतो. आर्द्र हवामान किंवा ऊबदार दिवसात दव पडण्याची पातळी वाढलेली असल्याने बुरशीही वाढते तसेच संक्रमणाचा दरही वाढतो.