गहू

पायरेनोफोरा पानावरील ठिपके

Pyrenophora tritici-repentis

बुरशी

थोडक्यात

  • पानाच्या पात्यांच्या खालच्या आणि वरच्या बाजुला पिवळ्या कडांसकट सुस्पष्ट बदामी तपकिरी डाग येतात.
  • पान करपणे टोकापासुन सुरु होऊन संपूर्ण पानभर पसरते.
  • गुलाबी किंवा लालसर रंगाचे दाणे (रेड स्मज) किंवा काळी रंगहीनता येऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

गहू

लक्षणे

पाने पिवळी पडणे किंवा करपणे किंवा दोन्हीही अशी लक्षणे अवतरतात. प्रथमतः बदामी तपकिरी करपट ठिपके पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजुने दिसतात व कालांतराने मोठे होऊन भिंगाच्या आकाराचे, वेगवेगळ्या मापाचे फिकट हिरवी किंवा पिवळी कडा असलेले बदामी डागात रूपांतरित होतात. या डागांचे केंद्र राखाडी होऊन वाळतात. ओलसर पाने असलेल्या उच्च आर्द्रता वातावरणात, डागांचे केंद्र गडद दिसतात. सुरवातीचे डाग वाढुन मोठे धब्बे तयार होतात यामुळे पाने वाळतात ज्यामुळे पानगळ होते. या बुरशीमुळे दाण्यांवर गुलाबी किंवा लालसर छटा (रेड स्मज) किंवा इतर बुरशींच्या सानिद्यात काळी रंगहीनता दिसते. तथापि, देठांवर काहीही परिणाम होत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

संतुलित खते देण्याने प्रतिस्पर्धी सूक्ष्म जंतु जमिनीत स्थिरावायला चालना मिळते. जंतु जसे अल्टरनेरिया अल्टेरनाटा, फ्युसॅरियम पॅलिडोरोसियम, अॅसिनेटोबॅक्टर कॅलकोसिटिकस, सेराशिया लिकेफेसियन आणि पांढरे खमीर पायरेनोफोरा पानावरील ठिपक्याच्या बुरशीचे प्रतिस्पर्धी आहेत आणि समाधानकारकरीत्या संक्रमण कमी करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पायराक्लोस्ट्रोबिन, पिकोक्झिस्टोबिन, प्रोपिकोनाझोल आणि प्रोथिकोनाझोलवर आधारीत बुरशीनाशकांची फवारणी पायरेनोफोरा पानावरील ठिपक्यांविरुद्ध चांगले परिणाम देते.

कशामुळे झाले

पायरेनोफोरा ट्रिटिसी-रिपेन्टिस नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. थंडीच्या मोसमात ही गव्हाच्या तनिसात किंवा बियाणांत जगते. वसंत ऋतुमध्ये वयात आल्यानंतर बीजाणू तयार होऊन सोडले जातात ज्यांचे वहन वार्‍याने आणि पाण्याच्या थेंबांनी होते. बीजाणूच्या मोठ्या आकारामुळे वहन फार थोड्या अंतरापर्यंतच होते. खालच्या पानाला ते संक्रमित करतात जिथे ते वाढतात आणि आणखीन बीजाणू तयार करतात जे रोगाला वरच्या पानांपर्यंत आणि इतर रोपांवर नेतात. बुरशीमुळे विषारी पदार्थांचे उत्पादन झाल्यामुळे झाड पिवळे पडणे आणि करपणे सारखी लक्षणे दिसू लागतात व ही प्रक्रिया प्रकाशावरही थोडीफार अवलंबुन असते. बीजाणू तयार होण्यासाठी ९५%पेक्षा जास्त आद्रता अनुकूल असते. दुय्यम संक्रमणासाठी पाने ओले रहाणे, उच्च आद्रता आणि १० डिग्री सेल्शियसवरील तापमान सलग दोन दिवसांसाठी गरजेचे आहे. पायरेनोफोरा पानावरील ठिपके या रोगाच्या प्रसारासाठी २०-२५ डिग्री सेल्शियसचे तापमान चांगले असते.


प्रतिबंधक उपाय

  • संक्रमित बियाणांमुळे बुरशी बहुधा लागण करीत असल्यामुळे प्रमाणित बियाणे विकत घ्या.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • बुरशीची वाढ रोखण्यासाठी लागवडीचे अंतर जास्तच ठेवा.
  • बुरशी जमिनीतील इतर प्रतिस्पर्धी सूक्ष्म जीवाणूंना संवेदनशील असल्यामुळे त्यांच्या संक्रमाणची जोखिम कमी करण्यासाठी पीक घेतल्यानंतर शेत चांगले नांगरुन घ्या.
  • मोहरी, अळशी, क्रॅम्बे किंवा सोयाबीन सारखे पर्यायी नसलेल्या यजमानांबरोबर दर दोन ते तीन वर्षांनी पीक फेरपालट करण्याची शिफारस केली जाते.
  • कोंब आणि फुले येण्याच्या सुमारास झाडाचे बारकाईने निरीक्षण करा.
  • पीक घेतल्यानंतर नांगरुन झाडाचे सर्व अवशेष नष्ट करा.
  • झाडाची प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी संतुलित खते द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा