जव

जाळीदार डाग

Pyrenophora teres

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर अतिसूक्ष्म तपकिरी डाग येऊन जाळीसारखी संरचना येणे हे जाळी सारखे डाग येणाऱ्या या रोगाचे वैशिष्ट्य आहेत.
  • डाग मोठे होतात आणि पूर्ण पात्यास ग्रासतात, बहुधा ह्यांच्याभोवताली पिवळी प्रभावळ असते.
  • दाट, तपकिरी, अंडाकृत, ३-६ मि.मी.
  • व्यासाची चिन्हे हे डाग स्वरूपाच्या रोगात येतात.
  • ओंबी वरील पानांवर बारीक तपकिरी पट्ट्यांमुळे दाणे आक्रसतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

जव

लक्षणे

जाळीच्या डागांचे दोन प्रकार आहेत: डाग आणि जाळी. लक्षणे जास्त करुन पानांवर आढळतात पण क्वचितच पर्णकोष आणि ओंबीच्या पानांवर देखील दिसतात. जाळीचे रुप अतिसूक्ष्म ठिपक्यांनी सुरु होते जे नंतर लांबट होतात आणि पातळ, गडद तपकिरी पट्टे तयार होऊन पूर्ण पानभर पसरतात, ज्यामुळे जाळीसारखी संरचना तयार होते. जुने डाग पानांच्या शिरांच्या बाजुने लांबट होतच रहातात आणि त्यांच्या सभोवताली पिवळी कडा असते. सुरवातीला ठिपके बारीक, गर्द तपकिरी, अंडाकृती, ३-६ मि.मी. व्यासाचे असतात. कणसातही संक्रमण होऊ शकते. बारीक तपकिरी पट्टे जाळीसारखे न दिसणारे, ओंबीवर येतात ज्यामुळे बिया आक्रसतात आणि उत्पादन कमी होते. संक्रमित दाण्यांच्या बुडाशी फिकट तपकिरी डाग असतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पायरेनोफोरा टेरेसविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ट्रायाझोल आणि स्ट्रोबिल्युरिन असलेली बुरशीनाशके दोन्ही प्रकारच्या जाळीच्या डागांचे नियंत्रण करण्यात परिणामकारक आहे. टेब्युकोनाझोलचा वापर टाळा. जास्त पाऊस पडणार्‍या भागात दोन फवारण्या करण्याची गरज भासु शकते. शक्यतो वेगवेगळी कार्य प्रणाली असलेली बुरशीनाशके आलटून पालटून वापरल्यास प्रतिकार निर्माण होण्याच्या घटना कमी होतात. बियाणांवर थर देणे हे जाळी डागांविरुद्ध परिणामकारक ठरते.

कशामुळे झाले

पायरेनोफोरा टेरेस नावाच्या बुरशीमुळे जाळीचे डाग तयार होतात. ही पिकांच्या अवशेषात आणि स्वयंभूर रोपांत जगते. हा रोग संक्रमित बियाणातून देखील परंतु सामान्यतः किरकोळ घटनांमध्ये येऊ शकतो. रोगाचा प्रसार वायुजन्य बीजाणू आणि पावसाच्या उडणार्‍या थेंबामुळे होतो. पिकाला प्राथमिक संक्रमण सुमारे ६ तास आर्द्र परिस्थिती आणि १०-२५ अंश तापमान असल्याने होते. प्राथमिक संक्रमणानंतर १४-२० दिवसांनी जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा बीजाणू वार्‍याने पसरतात. गंभीर संक्रमण झाल्यास पानाचा हिरवा भाग कमी होतो आणि झाडाची उत्पादकता कमी होउन पाने अकाली वाळतात. बुरशी खोडात देखील वाढते. काढणीनंतर ती अवशेषात रहाते जिथुन नंतरच्या हंगामात संक्रमण पुन्हा सुरु होते. जाळीचे डाग बियाणांचे वजन आणि दाण्यांची प्रत कमी करतात.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडांपासुन धरलेले किंवा प्रमाणित जंतुमुक्त स्त्रोताकडील बियाणेच वापरा.
  • उपलब्ध असल्यास सहनशील वाण लावा.
  • शक्य झाल्यास हंगामाच्या शेवटी पेरणी करा.
  • पेरणीच्या जागी गादीवाफे हे ऊबदार, ओलसर आणि चांगला निचरा असणारे हवेत.
  • बियाणांना पुरेशी आर्द्रता मिळण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खोल पेरु नका.
  • पुरेसे पोषण देण्याची काळजी घ्या.
  • जमिनीतील पालाशची पातळी पुरेशी असण्याची काळजी घ्या.
  • ओंबीचे पान निघतानाच्या काळात पिकाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा.
  • इतर कोणत्याही पिकासह दोन वर्षांसाठी तरी पीक फेरपालट करा.
  • गवत आणि स्वयंभू पिके नियंत्रणात ठेवा.
  • काढणीनंतर झाडांचे अवशेष गाडण्यासाठी खोल नांगरणी करा.
  • अवशेष पुढच्या हंगामात रहाणार नाही याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा