गहू

फ्युसॅरियम हेड ब्लाइट (फ्युसॅरियम नावाच्या बुरशीमुळे कणीस रोग)

Fusarium graminearum

बुरशी

थोडक्यात

  • ह्या रोगाची वैशिष्ट्ये दोन प्रकारच्या लक्षणांतुन दिसतात: रोपांवरील करपा आणि कणसावरील करपा.
  • रोपांवरील करप्याची प्रमुख लक्षणे म्हणजे खोडाच्या बुडाला फिकट तपकिरी, पाणी शोषल्यासारखे ठिपके येणे, रोपांची कुज होणे व करपा येणे हे आहेत.
  • पाणी शोषल्यासारखे फुलांचे गुच्छ आणि पाने त्राण नसल्यासारखी व फिकट रंगाची होणे हे कणसावरील करप्याचे दोन प्रमुख लक्षणे आहेत.
  • उबदार, दमट हवामानादरम्यान, मुबलक बुरशीच्या वाढीमुळे त्यांचा रंग गुलाबी ते फिकट तपकिरी होतो.

मध्ये देखील मिळू शकते


गहू

लक्षणे

रोगाच्या लक्षणांची तीव्रता पीक कोणत्या प्रकारचे आहे (नोंद करण्यासारखे यजमान आहेत गहु, ओटस आणि जव), लागण होण्याची वेळ आणि हवामान ह्यावर अवलंबुन असते. रोगाची वैशिष्ट्ये दोन प्रकारच्या लक्षणांतुन दिसतात: रोपांवरील करप्याची प्रमुख लक्षणे म्हणजे खोडाच्या बुडाला फिकट तपकिरी, पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात आणि रोपे उगवल्यानंतर लगेच पिवळी पडतात. ह्या रोगाचा प्रादुर्भाव संक्रमित बियाणे थंड, ओलसर जमिनीत पेरल्यास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. वाढीच्या नंतरच्या काळात बूड कुजणे हे सर्वसाधारणपणे आढळून येते. पाणी शोषल्यासारखे फुलांचे गुच्छ आणि पाने त्राण नसल्यासारखी व फिकट रंगाची होणे ही कणसावरील करप्याची दोन प्रमुख लक्षणे आहेत. उबदार, दमट हवामानादरम्यान, मुबलक बुरशीच्या वाढीमुळे त्यांचा रंग गुलाबी ते फिकट तपकिरी होतो. दाणे सुरकुतलेले आणि खडबडीत दिसतात. बहुधा जोपर्यंत सगळे गुच्छ बाधीत होत नाहीत तोपर्यंत संसर्ग एका फुलांच्या गुच्छावरुन दुसर्‍या गुच्छावर पसरत जातो. काही पिकांमध्ये 70% पर्यंत उत्पादनात घट झाल्याचे मूल्यांकन केले गेले आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

फ्युसॅरियम ग्रामिनेरमच्या लागणीचा परिणाम कमी करण्यासाठी पुष्कळशा जैव नियंत्रक पद्धतींची चाचणी यशस्वीपणे करण्यात आली आहे. गव्हात विविध जिवाणू उत्पाद ज्यात स्युडोमोनाज फ्ल्युरोसन्स, बॅसिलस मेगाथेरियम आणि बॅसिलस सबटिलिस आहेत त्यांना फुलधारणेच्या काळात रोगाची लागण, गंभीरता आणि पिकाचे नुकसान कमी करण्यासाठी वापरले गेले आहे. ह्यातील बहुतेक चाचण्या शेतातील नियंत्रित परिस्थितीत केल्या गेल्या आहेत. स्पर्धात्मक बुरशी ट्रायकोडर्मा हरझियानम आणि क्लोनोस्टॅचिस रोसियाचा वापरही थोड्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. गहू आणि जव ह्या पिकाच्या बियाण्यांना ५ दिवसांसाठी कोरडे ७० डिग्री सेल्शियसचे गरम उपचार केल्याने ह्या व इतर बुरशी पासुन प्रभावीपणे सुटका झालेले आढळले आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशक वापरण्याची वेळ ही ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. फुलधारणेच्या काळात ट्रियाझोल कुटुंबातील (मेटकोनाझोल, टेब्युकोनाझोल, प्रोथियोकोनाझोल आणि थियाबेन्डाझोल) बुरशीनाशकाची फवारणी ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी व धान्यातील विषारी पदार्थांचे उत्पादन कमी करण्यासाठी कारगर सिद्ध होते. हे लक्षात घ्या की या उत्पादांमुळे कापणीच्या वेळेचे बंधन आहे (हार्वेस्ट रिस्ट्रीक्शन पिरिएड - म्हणजे हे वापरल्यानंतर ते धान्यातुन पूर्णपणे नाहीसे होण्यास किंवा धान्य खाण्यालायक होण्यास काही काळ जावा लागतो).

कशामुळे झाले

ह्या रोगाची लक्षणे फ्युसॅरियम ग्रामिनेरम नावाच्या बुरशीमुळे होतात जी दोन मोसमांच्या मध्ये पर्यायी यजमानात किंवा जमिनीवरील पिकाच्या अवशेषात आणि जमिनीतील सेंद्रीय पदार्थांवर जिवंत रहाते. अनुकूल परिस्थितीत ही बीजाणू तयार करते जे लांब अंतरापर्यंत हवेने वाहून जाऊ शकतात. असेही समजले जाते कि मिज किड्याच्या काही प्रजातीही ह्यांचे वहन करतात. या बुरशीसाठी तृणधान्याची संवेदनशीलता फुलधारणेच्या कालावधीच्या आसपास सगळ्यात जास्त असते. एकदा का हे बीजाणू पानांमध्ये फलित झाले कि ते नैसर्गिक छिद्रातुन झाडाच्य आत प्रवेश करतात. जशी जशी बुरशीची वाढ होते तशी ती फुलांचा पाणी आणि पोषकांचा पुरवठा बाधीत करते ज्यामुळे फुले विशिष्ट पद्धतीने सुकल्यासारखी दिसतात आणि दाणे सुरकुतलेले येतात. शिवाय, विषारी पदार्थांचे उत्पादन झाल्यामुळे हे धान्य बाजारात विक्रीच्या लायकीचे रहात नाहीत. ह्या बुरशीच्या जीवन चक्रावर बर्‍याचशा हवामान घटकांचा जसे कि ऊन किती मिळते, तापमान, आर्द्रता, पाऊस किती पडतो आणि पाने किती वेळ ओली रहातात यांचा प्रभाव पडतो. बुरशीच्या वाढीसाठी २०-३२ डिग्री सेल्शियसमधील तापमान आणि पानांवर दीर्घकाळ रहाणारा ओलावा हे अतिशय अनुकूल आहे.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास रोग प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • ज्या ठिकाणी मुबलक सुर्यप्रकाश येईल आणि हवा चांगली खेळती राहील तिथे लागवड करा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा जेणेकरून पीकात हवा चांगली खेळती राहील.
  • यजमान नसणार्‍या पिकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा.
  • जमिनीच्या मशागतीची गरज तपासा कारण हे बुरशीच्या जीवन चक्रावर मोठा परिणाम करत असतात.
  • तण नियंत्रण व्यवस्थितरीत्या करा.
  • काढणी झाल्यानंतर पिकांचे सर्व अवशेष काढुन खोल पुरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा