गहू

सेप्टोरिया ट्रीटिसि धब्बे

Zymoseptoria tritici

बुरशी

थोडक्यात

  • प्रथमतः खालच्या पानांवर बारीक पिवळे ठिपके येतात.
  • जसेजसे ते मोठे होत जातात, या ठिपक्यांचा रंग बदलुन फिकट ते गडद तपकिरी अंड्याच्या आकाराचे किंवा पट्ट्यासारखे धब्बे तयार होतात.
  • डांगांमध्ये बारीक काळे ठिपकेही दिसतात व कालांतराने धब्बे तपकिरी रंगाचे, मोठे होतात आणि पूर्ण पानास ग्रासतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

गहू

लक्षणे

सेप्टोरिया ट्रीटिसि पानावरील धब्ब्यांची सुरवातीची लक्षणे खालच्या पानांवर बारीक पिवळे ठिपके रोप उगवल्यानंतर लगेच येतात. जसेजसे ते मोठे होत जातात, या ठिपक्यांचा रंग बदलुन फिकट ते गडद तपकिरी अंड्याच्या आकाराचे किंवा पट्ट्यासारखे धब्बे तयार होतात आणि पूर्ण पात्यावर पसरु शकतात. लक्षणे खोड आणि ओंबीवर देखील कमी प्रमाणात उमटु शकतात. या डागात काळी बीजाणू फळे दिसतात ज्यामुळे विशिष्ट ठिपकेदार संरचना दिसते. कालांतराने पूर्ण पानच मोठ्या तपकिरी तांबट रंगांच्या डागाने भरुन जाते आणि फक्त काही ठिकाणीच हिरवा भाग दिसतो ज्याभोवती पिवळी प्रभावळ असते. अखेरीस पान वाळल्याने मर होते. काळ्या बीजाणू फळांच्या अनुपस्थितीत अशीच धब्ब्यांची लक्षणे दुसर्‍या रोगामुळे किंवा पोषकांच्या कमतरतेमुळे दिसु शकतात, जसे कि अल्युमिनियमची विषासक्तता किंवा जस्ताची कमतरता. लक्षणे पहिल्यांदा झाडाच्या वाढीच्या नंतरच्या काळात आणि लागण झाल्यानंतर दोन ते तीन अठवड्यांनी दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

एम. ग्रामिनिकोलाविरुद्ध नियंत्रित परिस्थितीत जैवनियंत्रण एजंटसचा वापर यशस्वीरीत्या करण्यात आला आहे. ट्रायकोडर्मा गटातील बुरशी आणि स्युडोमोनॅडसच्या काही जाती आणि बॅसिलसच्या वापरामुळे गव्हाच्या रोपांचे या रोगापासून रक्षण केले गेले आहे किंवा रोगाची वाढ आटोक्यात आणली आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. एम. ग्रमिनिकोलाच्या भरपूर प्रजातींनी बुरशीनाशकास खास करुन स्ट्रोबिल्युरिन श्रेणीतील रसायनांविरुद्ध प्रतिकार निर्माण केला आहे. पिकाचे अपेक्षित नुकसान, बाजारातील गव्हाची मिळु शकणारी किंमत आणि बुरशीनाशके वापरण्याचा खर्च अस हे आर्थिक गणित जुळवाव लागत. सर्वसाधारणपणे अॅजोल गटातील बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. इतर बुरशीनाशके जसे कार्बोक्झामाइड किंवा बेन्झोफेनोन आलटून पालटून वापरल्यास प्रतिकारशक्तीचा विकास कमी करण्यास मदत होते.

कशामुळे झाले

मायकोस्फेरेला ग्रामिनिकोला नावाच्या बुरशीमुळे हा रोग उद्भवतो. ही जमिनीतील झाडांच्या अवशेषात, गवती यजमानात आणि शरद ऋतुत लागवड केलेल्या पीकात विश्रांती घेते. बीजाणूचे वहन वार्‍याने, पावसाच्या थेंबांनी लांब अंतरापर्यंत होते. पहिली लक्षणे जुन्या पानांवर दिसतात आणि जसजसे बीजाणू वर पसरत जातात तसतसे वरच्या पानांवरही डाग उमटतात. जर ओंबी शेजारचे पान आणि त्याखालील दोन पाने संक्रमित झाली तर उत्पादन कमी येते. बुरशीचा जीवनक्रम हवामानाप्रमाणे १५-१८ दिवसांचा असतो. १५ ते २५ डिग्री सेल्शियसचे तापमान, भरपूर पाणी किंवा लांबलेल्र्या आर्द्र हवामानामुळे ही चांगली फोफावते. जर तापमान ४ डिग्री सेल्शियसच्या खाली गेले तर यांचा जीवनक्रम ठप्प होतो. यशस्वी संक्रमण करण्यासाठी किमान २० तासांसाठी उच्च सापेक्ष आद्रता असणे गरजेचे आहे. वसंत ऋतुतील ओलावा आणि उन्हाळा यांना फारच मानवतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास सहनशील वाण लावा.
  • मोसमात उशीरा पेरणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
  • चांगली खेळती हवा ठेवण्यासाठी लागवडीचे अंतर पुरेसे सोडा.
  • नत्रयुक्त खते आणि संप्रेरके कमी वापरा.
  • शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • स्वयंभू रोप आणि तणांचे नियंत्रण करा.
  • पर्यायी यजमान नसलेल्या पीकांबरोबर एक किंवा दोन वर्षे पीक फेरपालट करा.
  • झाडाचे अवशेष खोल नांगरुन गाडुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा