Microdochium sorghi
बुरशी
ह्या रोगाची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे पानांवर, पानांच्या देठांजवळ आणि कणसांत दिसतात. पानांवर लालसर तपकिरी आणि पाणी शोषल्यासारखे ठिपके विकसित होतात, कधीकधी त्यांना अरुंद फिकट हिरव्या प्रभावळीही येतात. जसे ते आकाराने मोठे होत राहतात तसे ते फिकट तपकिरी केंद्राचे आणि लालसर कडांचे होतात. जर ते पानाच्या कडेने आले तर ते अर्धगोलाकृती असतात व मध्यशिरेच्या बाजुला आल्यास ते गोलाकार असतात. एक सोडुन एक किंवा एकाच भागात फिकट आणि गडद वर्तुळे असलेले वैशिष्ट्यपूर्ण धब्बे स्पष्ट दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास ठिपके एकमेकांत मिसळतात आणि पूर्ण पानांना वेढतात. पानांवर विविध लांबीचे, आकाराचे आणि मापाचे गडद लाल ते काळसर जांभळे किंवा तपकिरी ठिपके दिसतात. संक्रमित पाने पिवळी पडुन वाळुन मरतात. करपलेल्या भागात बुरशीची वाढ झालेली निदर्शनात येते. संक्रमित कणसेसुद्धा करपतात.
ह्या बुरशीविरुद्धकोणतेही जैव नियंत्रण उपचार उपलब्ध नाहीत असे दिसते. जर आपणांस ह्या रोगाच्या घटना किंवा गंभीरता कमी करण्याचे कोणत्याही पद्धतीचे उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आर्थिक दृष्ट्या जास्त खार्चिक असल्याने बुरशीनाशकांच्या वापराची बहुधा शिफारस केली जात नाही. ह्या रोगाच्या व्यवस्थापनातील पर्यायात कापणीनंतर पिकाच्या अवशेषांचे व्यवस्थापन आणि पीक फेरपालट हेच सगळ्यात जास्त व्यवहार्य रोग व्यवस्थापन पर्याय आहेत.
ग्लिओसर्कोस्पोरा सोर्घी नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात जी बियांमध्ये किंवा जमिनीत खूप वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. ह्या बुरशीच्या रचनेला स्क्लेरोशिया (छोटे गडद ठिपके व्रणात दिसणे) म्हणतात आणि तोच संसर्गाचा मुख्य स्त्रोत असतात आणि जेव्हा अनुकूल हवामान असते उदा. दमट आणि ओले वातावरण, तेव्हा उद्रेक करु शकतात. जुन्या व खालच्या पानांवर ही बुरशी वाऱ्याने किंवा उडणार्या पाण्याच्या थेंबांद्वारे पसरते. जर अनुकूल हवामान असेल तर रोग झाडात वरपर्यंत पसरु शकतो व सगळ्या पानांवर ठिपके दिसतात. ज्या बुरशीमुळे ज्वारीवर हा रोग येतो तीच बुरशी इतर तृणधान्यांना जसे कि मका, बाजरी, संक्रमित करते. पुढील हंगामांसाठी हे इतर पर्यायी यजमान लशीचे भंडार म्हणून काम करू शकतात.