ज्वारी

ज्वारीच्या पानावरील खडबडीत ठिपके

Ascochyta sorghi

बुरशी

थोडक्यात

  • पानावर बारीक उंचवटलेले लालसर ठिपके येतात व कालांतराने बारीक काळ्या फोडात बदलतात.
  • हे फोड फुटल्यास काळे वलय असलेले पांढरे व्रण सोडतात.
  • या व्रणांवर अतिशय बारीक, काळी, कडक उंचवटलेली बुरशी येते ज्यामुळे संक्रमित भाग खडबडीत दिसतात.
  • संक्रमणाच्या शेवटच्या टप्प्यात, पाने वाळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ज्वारी

लक्षणे

संक्रमणाच्या सुरवातीच्या काळात पानांवर बारील लालसर ठिपके उमटतात. हे ठिपके हळुहळु फुगतात आणि बारीक काळ्या फोडात बदलतात. बहुधा हे डाग पानाच्या वरच्या बाजूला दिसतात. हे फोड अखेरीस फुटतात आणि काळे वलय असलेले पांढरे व्रण सोडतात व कालांतराने हे व्रण लंबवर्तुळाकार वाढतात जे लाल केंद्र असलेले गडद लाल ते जांभळ्या रंगात रुपांतरीत होतात. हे व्रण एकमेकात मिसळून लाल कडा असलेले बरेच तपकिरी भाग तयार होतात. या व्रणांवर अतिशय बारीक, काळी, कडक उंचवटलेली बुरशी येते ज्यामुळे संक्रमित भाग खडबडीत दिसतात. या भागांना पिक्नीडिया असेही म्हणतात व काही वेळा हे निरोगी दिसणार्‍या पानांवर देखील दिसु शकतात. काही वेळा खोड आणि पर्णकोषांवर देखील असेच व्रण दिसु शकतात. संक्रमणाच्या शेवटच्या टप्प्यात, पाने वाळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

अॅस्कोचायटा सोरघीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपरवर आधारीत बुरशीनाशके जसे कि बोर्डो मिश्रण या रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. तथापि लक्षात घ्या कि यामुळे झाडात विषारी प्रतिक्रिया होऊ शकते.

कशामुळे झाले

पिकांच्या अवशेषात राहणाऱ्या अॅस्कोचायटा सोरघी नावाच्या बुरशीमुळे ही विशिष्ट लक्षणे उद्भवतात. उच्च आर्द्रता लागणीस अनुकूल असते जी फोडात तयार झालेल्या बीजाणूद्वारे होते. हे जंतु अमेरीकेच्या बहुतेक भागात, आशिया, आफ्रिका आणि युरापातील ज्वारी लागवडीच्या भागात आढळतात. या ए. सोरघी बुरशीमुळे पीकाचे जास्त नुकसान होत नाही आणि म्हणुन ज्वारीच्या उत्पादनावर याचा परिणाम फारच कमी असतो. ज्वारीत रोग प्रतिकारक गुण विकसित होणे हे या रोगाचे आर्थिक महत्व कमी होण्यामागचे कारण आहे. या पिकाव्यतिरिक्त ही अॅस्कोचायटा सोरघी बुरशी इतर धान्यांच्या पीकांनाही जसे कि जॉनसन गवत ( सोरघुम हालेपेनसे), सुदान गवत (सोरघुम सुदानिज) आणि जव (हॉर्डियम व्हरगेर) संक्रमित करते.


प्रतिबंधक उपाय

  • स्वच्छ आणि निरोगी बियाणे वापरण्याची खात्री करा.
  • ज्वारीचे संवेदनशील वाण टाळा.
  • हवा चांगली खेळती ठेवण्यासाठी दोन रांगेतील अंतर जास्त ठेवा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • जास्त पाणी देऊ नका आणि तुषार सिंचन टाळा.
  • विविध पीकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • शेतातील व बांधावरील सुदान गवत, जव किंवा जॉनसन गवत सारखे पर्यायी यजमान काढून टाका.
  • पाने ओली असताना शेतात काम करणे टाळा.
  • शेतात स्वच्छता राखा.
  • खोल नांगरणी करा जेणेकरून जमिनीतील रोगकारक जंतु जे झाडांच्या अवशेषात किंवा कोषात विश्रांती घेत आहेत त्याचे नियंत्रण होईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा