इतर

काजळी कांडी करपा (चारकोल रॉट)

Macrophomina phaseolina

बुरशी

थोडक्यात

  • पक्व ताटाच्या आतील भागावर काळी रंगहीनता दिसते ज्यामुळे पूर्ण झाड करपल्यासारखे दिसते.
  • रोगग्रस्त कांड्यामध्ये घट्ट धाग्यांसारख्या पेशींबरोबर काळे बुरशीचे ठिपके दिसतात.
  • झाडे कमकुवत ताटांसोबत अकाली परिपक्व होतात ज्यामुळे तुटतात किंवा आडवी होतात.
  • वरची पाने पिवळी पडून वाळतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

जमिनीत रहाणारी बुरशी रोपावस्थेत मुळातून आत शिरकाव करून हळुहळु ताटांपर्यंत लक्षणांशिवाय पसरते. नंतर पक्व ताटाच्या आतील भागावर काळी रंगहीनता दिसते ज्यामुळे पूर्ण झाड करपल्यासारखे दिसते म्हणुन हे नाव. कूज हळुहळु ताटाच्या वाहक भागात घर करते आणि कांड्यामध्ये टणक धाग्यांच्या पेशींबरोबर काळे बुरशीचे ठिपके दिसतात. वाहतूक ऊतींचा नाश झाल्यामुळे पाण्याच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसु लागतात. झाडे कमकुवत ताटांसोबत अकाली परिपक्व होतात ज्यामुळे तुटतात किंवा आडवी होतात. वरची पाने प्रथम पिवळी पडून वाळतात. तपकिरी पाणी शोषल्यासारखे डाग मुळांवर दिसतात. गंभीर संक्रमण झाल्यास ५०% पेक्षा जास्त ताटे तुटु शकतात किंवा आडवी होऊ शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सेंद्रिय उपचार जसे कि शेणखत, नीम तेल अर्क आणि मोहरीच्या पेंडीचा वापर करून या मॅक्रोफोमिनाचे नियंत्रण केले जाऊ शकते. बाजरी आणि तणांवर आधारीत कंपोस्ट जमिनीत सुधार करण्यासाठी वापरल्यास जमिनीतील बुरशी २०-४०% कमी होते. ट्रिकोडर्मा व्हिरिडेचा जमिनीतील वापर (५ किलो एन्रिच्डला २५० किलो व्हर्मिकंपोस्ट किंवा शेणखतात मिसळुन) पेरणीच्या वेळी केल्यास मदत मिळते.

रासायनिक नियंत्रण

बुरशीनाशकांची फवारणी जास्त परिणामकारक नसते कारण जेव्हा पहिले लक्षण दिसते तेव्हा नुकसान आगोदरच झालेले असते. बुरशीनाशकांचे पानांवरील फवारे परिणामकारक नाहीत कारण पहिले लक्षण दिसेपर्यंत नुकसान आधीच झालेले असते. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया (उदा. मँकोझेबने) केल्यास रोपावस्थेत चांगले संरक्षण मिळु शकते. एमओपी ८० किलो/हे चा वापर दोन विभाजित वापरतात केला असता रोपांनाजोम मिळुन ती या बुरशीस सहनशील होतात.

कशामुळे झाले

मॅक्रोफोमिना फॅसियोलिना नावाच्या बुरशीमुळे हा रोग उद्भवतो, जी उष्ण आणि कोरड्या हवेत फोफावते. तीन वर्षांपर्यंत ती यजमान पीकांच्या जमिनीतील अवशेषात किंवा जमिनीत राहू शकते. मुळांना आणि खोडातील वाहतुक पेशींना झालेली यामुळे पाणी आणि पोषकांचे वहन नीट होत नाही म्हणुन झाडाचा वरचा भाग वाळतो व कमकुवत ताटांसोबत अकाली परिपक्वता येते. बुरशी प्रसारासाठी पुढील अनुकूल परिस्थिती किडे, क्षतिग्रस्त मूळे आणि कोंब तसेच इतर रोगांद्वारे निर्माण होते. दुष्काळात, जमिनीचे वाढलेले तापमान (२८ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त) आणि झाडाच्या वाढीच्या नंतरच्या काळामध्ये खताच्या अतिरेकी वापरामुळे या रोगाचे संक्रमण खूप अधिक वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • दुष्काळास सहनशील व आडवे न होणारे वाण लावा.
  • पेरणीची वेळ अशी सुनियोजित करा जेणेकरून फुलधारणेनंतरचा काळ कोरड्या वातावरणामध्ये येणार नाही.
  • लागवडीतील अंतर जास्त ठेवा.
  • सिंचनाच्या माध्यमातून जमिनीतील आर्द्रता खासकरून फुलधारणेनंतरच्या काळात चांगली राखा.
  • संतुलित खत नियोजन करा व नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा.
  • उत्पादनात मोठे नुकसान टाळण्यासाठी पीक लवकर काढा.
  • गहू, ओटस्, भात, जव आणि राय सारख्या पर्यायी यजमान नसणार्‍या पीकांसोबत कमीतकमी तीन वर्षांसाठी पीक फेरपालट करा.
  • खोल नांगरुन झाडाचे अवशेष गाडुन टाका ज्यामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाण कमी होण्यात मदत होईल.
  • मशागत झाल्यानंतर जमिनीला चांगले तापू दिल्यास परिणाम चांगले मिळतात.
  • उद्रेकी भागात शेतकर्‍यांनी हिरवे खत जमिनीत मक्याच्या पेरणीपूर्वी देण्याचा सल्ला देण्यात येतो.

प्लँटिक्स डाऊनलोड करा