Cercospora capsici
बुरशी
संक्रमणाच्या सुरवातीच्या काळात पानांवर राखाडी केंद्राचे लालसर तपकिरी कडा असलेले ठिपके उमटतात. ते कालांतराने १.५ सें.मी, पर्यंत मोठे होऊन गोल, गव्हाळ रंगाचे सभोवताली केंद्रीत वर्तुळे असलेले, पांढरट केंद्र असलेले होतात. गडद वर्तुळे आणि पिवळ्या प्रभावळीमुळे ते वैशिष्ट्यपूर्ण बेडकाच्या डोळ्यांसारखे दिसणारे होतात. हे ठिपके जास्त संख्येने पानांवर येतात आणि हळुहळु एकमेकांत मिसळुन मोठे डाग तयार होतात. केंद्र सुकते आणि गळते ज्यामुळे बंदुकीने गोळी मारल्यासारखे दिसते. संक्रमणाच्या नंतरच्या काळात पाने पिवळी पडून वाळतात आणि मरगळतात किंवा गळतात ज्यामुळे फळे उन्हाने करपतात. गंभीर बाबतीत फळांच्या देठांवर आणि पुष्पकोषांवरही हे डाग दिसुन येतात ज्यामुळे देठाकडील भागांची कूज होते.
५२ डिग्री सेल्शियस तापमान असणार्या गरम पाण्यात बियाणे ३० मिनिटे बुडविली असता बियाणावरील बुरशी कमी होते. हे लक्षात घ्या की जर हे उपचार योग्य केले गेले नाहीत (जास्त काळ बुडविणे किंवा तापमान) बियाण्याच्या उगवण क्षमतेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. पानांवरील फवारणीसाठी कॉपर हायड्रॉक्साइड असणारे उत्पाद, ठिपके दिसताक्षणीच वापरावेत आणि काढणीच्या आधी ३-४ अठवड्यांपर्यंत दर १०-१४ दिवसांच्या अंतराने फवारावेत. पानांच्या दोन्ही बाजुने फवारणी करणे महत्वाचे आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॅप्टन (३ ग्रॅम प्रति किलो) ची बीज प्रक्रिया केल्यास या रोगाचा सामना केला जाऊ शकतो. इतर उपचारात कॉपर हायड्रॉक्साइड, क्लोराँथॅलोनिल किंवा मँकोझेबची पानांवरील फवारणी केल्याने या रोगाचे नियंत्रण केले जाऊ शकते. ठिपके पहिल्यांदा येतात तेव्हाच उपचार सुरु करावेत आणि १०-१४ दिवसांच्या अंतराने, काढणीच्या ३-४ अठवडे आधीपर्यंत करीत रहावेत. पानांच्या दोन्ही बाजुला फवारणी करणे महत्वाचे आहे.
सर्कोस्पोरा कॅपिसी नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात, जी खासकरुन उष्णकटिबंधीय प्रदेशात फारच लवचिक असते आणि गादीवाफ्यातील तसेच शेतातील रोपांना प्रभावित करते. बुरशी बियाणांत, जमिनीवर आणि संक्रमित रोपांच्या अवशेषात जिवंत राहते. बिजाणू पाणी, पाऊस, वारा आणि पानांच्या पानांशी घर्षणाने आणि अवजारे, हत्यारे आणि कामगारांद्वारे पसरतात. पानांवरील संक्रमण, बीजाणू थेट पानांत शिरुन होते आणि ओले वातावरण यासाठी खूप अनुकूल असते. संक्रमणासाठी 23 डिग्री सेल्शियसचे उबदार तापमान आणि ७७-८५% वरील सापेक्ष आद्रता हे वातावरण फारच अनुकूल असते. जर ही परिस्थिती जुळुन आली तर उत्पन्नावर चांगलाच परिणाम होतो, खासकरुन जर संक्रमण मोसमाच्या सुरवातीला झाले.