Colletotrichum graminicola
बुरशी
झाडाचे प्रकार, वातावरण परिस्थिती आणि बुरशीची ताकद यावर संक्रमणाचा परिणाम अवलंबुन आहे. संवेदनशील वाणात संक्रमणाचे वैशिष्ट्य तीन विशेष टप्प्यात दिसते: पानावरील ठिपके, शेंडेमर आणि खोडकुज. प्रथमत: बारीक अंडाकृती पाणी शोषल्यासारखे ठिपके खालच्या पानांवर, टोकाकडे किंवा मध्यशीरे जवळ दिसतात व नंतर वरच्या पानांवर दिसतात. ते कालांतराने अर्धपारदर्शक होऊन गव्हाळ केंद्र आणि जांभळट कडा असलेल्या डागत बदलतात व नंतर एकमेकांत मिसळून करप्यांचे धब्बे संपूर्ण पानाभर पसरतात. झाडाच्या वाढीच्या नंतरच्या काळात, जर हवामान अनुकूल असेल तर मृत पेशींवर गडद, उंचावलेले ठिपके दिसतात. खोडाला आणि फांद्यांना झालेल्या जखमांमुळे आतील पेशीत बुरशी घर करते ज्यामुळे इतर लक्षणे जसे शेंडेमर आणि खोडकुज दिसुन येते.
कोलेटोट्रिचम ग्रामिनिकोलाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार आमच्या माहितीत नाहीत. जर आपणांस या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आजपर्यंत तरी या रोगाविरुद्ध कोणतेही परिणामकारक बुरशीनाशके उपलब्ध नाहीत.
बुरशी जमिनीतील झाडांच्या अवशेषात रहाते व तिथुन वसंतऋतुमध्ये ती खालच्या पानांवर वारा आणि पावसाच्या उडणार्या पाण्याने पसरते. जे डाग पानाच्या पात्यांवर येतात ते खोडाला आणि झाडाच्या वरच्या भागाला दुय्यम लागण करवितात. खोडाला झालेल्या जखमांमुळे आतील भागात लागण होण्याची शक्यता वाढते. जर हवामान अनुकूल असेल तर अखेरीस इतर लक्षणे जसे कि शेंडेमर आणि खोडकुजही दिसतात. बुरशीच्या (आणि रोगाच्या) जीवनक्रमास उष्ण तापमान (२० ते ३० डिग्री सेल्शियस), जास्त काळासाठी उच्च सापेक्ष आर्द्रता आणि वारंवार पाऊस अनुकूल असतो. बुरशी रोपावस्थेत संक्रमण करू शकते पण योग्य खते वापरली असतील तर उत्पादनात मोठी घट होते नाही. झपाट्याने वाढणाऱ्या पानांवर लक्षणे कमी विकसित होताना दिसतात.