भुईमूग

फायलोस्टिक्टा नावाचे पानांवरील डाग

Nothophoma arachidis-hypogaeae

बुरशी

थोडक्यात

  • गोलाकार किंवा अनियमित आकाराचे लालसर तपकिरी रंगाच्या किनारीचे फिकट गव्हाळ रंगाचे डाग पानांवर दिसतात.
  • जसजसा रोग वाढत जातो, डाग राखाडीसर होऊन सुकायला लागतात.
  • अखेरीस तो भाग गळुन तिथे छिद्र निर्माण होते ज्यामुळे पाने फाटल्यासारखी दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भुईमूग

लक्षणे

गोलाकार ते अनियमित आकाराचे लालसर तपकिरी किनार असलेले फिकट गव्हाळ रंगाचे (१.५ ते ५ मि.मी.) डाग पानांवर उमटतात. जसजसा रोग वाढत जातो तसतसे डागाचे केंद्र राखाडीसर होऊन सुकु लागते, काही वेळा तो भाग गळुनही पडतो ज्यामुळे पानांवर छिद्र निर्माण होते आणि पाने फाटल्यासारखी दिसतात. डाग मोठे होऊन एकमेकांत मिसळुही शकतात ज्यामुळे मोठे अनियमित आकाराचे तपकिरी सुकलेले धब्बे तयार होतात. काळे, मिरीसारखे बुरशीचे डाग पानाच्या दोन्ही बाजुतील रोगट भागांमध्ये दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

फायलोस्टिक्टा आराचिडिशीपोगेवरील कोणतेही पर्यायी उपचार आम्हास ठाऊक नाहीत, माफ करा. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फायलोस्टिक्टा नावाचे पानांवरील डागांमुळे होणारे नुकसान हे फारच कमी असते म्हणुन बुरशीनाशकांच्या वापराची शिफारस क्वचितच करण्यात येते.

कशामुळे झाले

बुरशी एक वर्षापर्यंत रोपाच्या जमिनीवरील कचर्‍यात सक्रियपणे जिवंत राहू शकते. जमिनीवरुन ती बहुधा रोपाच्या इतर रोगांनी नुकसानीत आणि सुकलेल्या भागात किंवा शेत कामाच्या वेळी झालेल्या जखमातुन (दुय्यम लागण) संक्रमण करते. नंतर मग ती निरोगी भागांपर्यंत पोचते आणि विशिष्ट लक्षणे दिसतात. बुरशीच्या इष्टतम वाढीसाठी आणि रोगाच्या प्रसारासाठी २५-३० डिग्री सेल्शियसचे तापमान आणि सामू ५.५-६.५ असल्यास अनुकूल असतो. फायलोस्टिक्टा नावाचे पानांवरील डाग हे भुईमुगावरील मोठा रोग मानले जात नाहीत.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिरोधक बियाणांचा वापर करा.
  • शेतात काम करताना रोपांना धक्का लागु देऊ नका.
  • कापणीनंतर रोपांचे अवशेष काढुन जाळुन टाका.
  • जमिनीचा सामू वाढविण्यासाठी चुना द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा