स्ट्रॉबेरी

बॉट्रिटीस करपा

Botrytis cinerea

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर, कोंबांवर, फळांवर किंवा शेंगांवर राखाडी बुरशी दिसुन येते.
  • झाडावर बुरशीचे चट्टे येतात.
  • प्रभावित झाडाचे भाग मरगळतात, तपकिरी होऊन कोलमडतात.
  • लाकडी पिकांवर देवीचे व्रण (कँकर) तयार झालेले दिसुन येतात.

मध्ये देखील मिळू शकते


स्ट्रॉबेरी

लक्षणे

पानांवर, फांद्यांवर किंवा फळांवर बुरशीची विपुल वाढ हे खूपच लक्षणीय लक्षण आहे. सुरवातीला अधीमधी पाणी शोषल्यासारखे तपकिरी ठिपके झाडाच्या जमिनीशी संपर्कात असलेल्या भागांवर किंवा इजा झालेल्या भागात दिसतात. ह्या भागात केसाळ आणि राखाडी ते तपकिरी रंगाच्या बुरशीचे धब्बे विपुल प्रमाणात विकसित होतात. नंतरच्या काळात ही बुरशी नव्या फळांवर आणि शेंगांवर वाढत असल्यामुळे ते मळकट दिसतात. किंवा माल साठवण करताना ही लक्षणे प्रकर्षाने दिसतात व दोन्ही बाबतीत नुकसान मोठ्या प्रमाणात होते. बुडातील पाने व फांद्या सडून सर्व पीक नासते (मरगळुन मरते). कधीकधी, लाकडी पिकांवर फांदी मर किंवा देवीचे व्रण तयार झालेले दिसुन येतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जैविक बुरशीनाशक ज्यात स्पर्धात्मक बुरशी ट्रायकोडर्मा हार्झियानम आहेत ते करडी काजळी विरुद्ध बर्‍याच पीकांवर परिणामकारक आहेत. उत्पाद जे स्ट्रेप्टोमाइसेस ग्रिसिओवायराइडसवर आधारीत आहेत ते लेट्युस पिकावर वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर. बुरशीवर नियंत्रण मिळविणे कठिण आहे कारण ह्या बुरशीची लागण शक्यतो काढणीच्या वेळी यजमान रोपांत घर करतात आणि ह्यावेळी रसायने जे विषारी अवशेष मागे ठेवतात त्यामुळे ते वापरता येत नाहीत. लवकर प्रादुर्भाव झाल्यास बेनोमिल किंवा क्लोरोथॅलोनिलची पानांवर फवारणी करुन ह्यांची वाढ नियंत्रित करता येते. फ्ल्युअॅन्झीनॅम आणि थिओफेट-मिथाइलवर आधारीत इतर बुरशीनाशकेसुद्धा चांगले काम करतात. जर बुरशीनाशके खूप तीव्रतेने वापरली गेली तर सामान्यपणे बुरशीत या बुरशीनाशका विरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित होत असते.

कशामुळे झाले

ह्या रोगाचे लक्षण बोट्रीटिस सिनेरिया या जमिनीजन्य बुरशीमुळे उद्भवतात, जी वाढुन झाडाचे सर्व भाग संक्रमित करु शकते. ओलसर हवामान, वारंवार पाऊस आणि थंड तापमान ह्या लक्षणांसाठी पोषक असतात. बुरशीच्या वाढीसाठी, प्रादुर्भाव करण्यासाठी व रोगाची प्रगतीसाठी सर्वोत्तम तापमान १५ ते २० डिग्री सेल्शियस आहे. लक्षणे पहिल्यांदा पानांवर किंवा शेतकामाच्या वेळी रोपाच्या ज्या भागाला इजा झाली आहे त्या ठिकाणी किंवा गारपीट झाली असताना किंवा गोठलेले दव पडलेल्या ठिकाणी दिसून येतात. जमिनीजवळची पाने सगळ्यात जास्त असुरक्षित असतात. जास्त पाणी दिल्यास किंवा खूप दाटीमुळे तयार होणारे वातावरण ह्या रोगाच्या प्रसारासाठी अत्यंत पोषक असते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्रोतांकडील बियाणे किंवा रोपे वापरा.
  • रोग प्रतिकारक किंवा सहनशील प्रकारच्या वाणांची निवड करा.
  • लवकर लागवड करा किंवा तयार होणार्‍या वाणांची लागवड करा.
  • लागवडीचे अंतर योग्य ठेवा.
  • रोपे एका रेषेत लावा आणि सरळ उभी राहतील अशी व्यवस्था करा.
  • बुरशीचे जीवनचक्र दूषित करण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्यासाठी पालापाचोळ्याचे अच्छादन करा.
  • पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ द्या व अयोग्य सिंचन टाळा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी नेहमी पाहणी करा आणि सडणारे झाडांचे भाग काढुन टाका.
  • शेतात काम करताना झाडांना इजा होऊ नये ह्याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा