भात

भातावरील पर्णकोष करपा

Rhizoctonia solani

बुरशी

थोडक्यात

  • खोडावर अंडाकृती, हिरवे ते राखाडी पाणी शोषल्यासारखे डाग दिसतात.
  • पान आणि खोडांवर अनियमित राखाडी ते पांढरे डाग तपकिरी कडांसकट दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

रोगाची सुरवातीची लक्षणे खोडावर (पर्णकोषांवर) पाण्याच्या पातळीजवळ डागाच्या रुपात दिसतात. हे डाग अंडाकृती, हिरवट राखाडी १-३ सें.मी. लांबीचे आणि पाणी शोषल्यासारखे दिसतात. हे डाग अनियमित वाढतात आणि तपकिरी कडासकट राखडी ते पांढरे होतात. जसजसा रोग वाढत जातो, झाडाचा वरचा भागही प्रभावित होतो. या भागांवर, वेगाने वाढणारे डाग दिसतात आणि संपूर्ण पान गडद होते. यामुळे संपूर्ण पान व कालांतराने झाड वाळते. या व्यतिरिक्त, झाडाच्या पृष्ठभागावर बुरशीजन्य पुटकुळ्या येतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

दुर्दैवाने आजतागायत कोणत्याही प्रभावी जैव नियंत्रण पद्धती उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लागण टाळण्यासाठी पुढील बुरशीनाशके वापरा: हेक्झाकोनाझोल एसइसी (२ मि.ली./ली.) किंवा व्हॅलिडामयसिन ३ ली. (२ मि.ली./ली.) किंवा प्रॉपिकोनाझोल २५ इसी (१ मि.ली./ली.) किंवा ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन + टेब्युकोनाझोल (०.४ ग्राम/ली.). १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या करा.

कशामुळे झाले

भातावरील पर्णकोष करप्यासाठी २८ आणि ३२ डिग्री सेल्शियस मधील उच्च तापमान, नत्रयुक्त खतांचा अतिरेक वापर आणि सुमारे ८५-१००% उच्च सापेक्ष आद्रता अनुकूल असते. खासकरुन पावसाळ्यात लागणीची जोखिम आणि रोग प्रसार जास्त होतो. दाट लागवडीमुळे दमट हवामान व झाडांचा संपर्क अनुकूल होतो. बुरशी अनेक वर्षांपर्यंत स्क्लेरोटियम (खपली) सारखी जमिनीत रहाते. शेतात पाणी भरल्यास ही खपली पाण्यावर तरंगते. जेव्हा ती भाताच्या रोपाच्या संपर्कात येते तेव्हा ती पानाच्या कवचातुन आत शिरते आणि संक्रमण सुरु करते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरण्याची काळजी घ्या.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास या रोगास प्रतिकारक वाण लावा.
  • रोपणी उशीरा करा.
  • रोपणीच्या वेळी एकरी रोपांचे प्रमाण कमी करा किंवा लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • पिकांसाठी संतुलित खत नियोजन राखा आणि नत्रयुक्त खतांचा विभाजित वापर करा.
  • पिकाची इष्टतम घनता (थेट पेरणी किंवा रोपणीत) राखून ठेवा.
  • खासकरुन बांधावर तण नियंत्रण चोखपणे करा.
  • रोगाची साथ होऊ नये म्हणुन हंगामात लवकर पाण्याचा चांगला निचरा होऊ द्या.
  • काढणीनंतर रोपांचे अवशेष काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा