Trachysphaera fructigena
बुरशी
फळांच्या टोकावर सुकलेला, राखाडी ते काळा कुजलेला भाग विकसित होणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे. बुरशीची सुरवात खर तर फुलधारणेच्या काळापासूनच होते आणि फळांच्या पिकण्याच्या प्रक्रियेला धोक्यात टाकते. संक्रमित भाग राखाडीसर बुरशीच्या वाढीने व्यापला जातो आणि चिरुटाच्या जळत्या टोकाच्या राखेसारखा दिसतो म्हणुन हे सामान्य नाव. हा रोग साठवणीत किंवा वाहतूकीच्या दरम्यान संपुर्ण फळावर पसरु शकतो, परिणामी “ममीफिकेशन” (प्रेतवत) प्रक्रिया घडते. फळांचा आकार विकृत होतो, त्यांच्या पृष्ठभागावर बुरशी दिसते आणि सालींवर डाग स्पष्ट दिसतात.
बेकिंग सोड्यावर आधारीत फवारणी बुरशीच्या नियंत्रणासाठी केली जाऊ शकते. हे औषध तयार करण्यासाठी १०० ग्रॅम बेकिंग सोडा, ५० ग्रॅम साबण, २ लिटर पाण्यात मिसळा. या मिश्रणाची फवारणी संक्रमित फांद्या आणि जवळपासच्या फांद्यांवरही संसर्ग टाळण्यासाठी करा. या फवारणीमुळे केळ फणीच्या पृष्ठभागाची सामू पातळी वाढते आणि बुरशीच्या लागणीस आळा घालते. कॉपर बुरशीनाशक फवारण्या देखील प्रभावी असू शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. साधारणपणे हा रोग फारसे महत्व राखत नाही आणि क्वचितच याला रसायनिक नियंत्रणाची गरज लागते. संक्रमित घडांवर मँन्कोझेब, ट्रायोफेनेट मिथाइल किंवा मेटालॅक्झिलची एक वेळेस फवारणी करून प्लास्टिकचे आवरण घालून ठेवा.
ट्राकिस्फेरा फ्रुक्टिजेना आणि काही वेळा वेगळी बुरशी (व्हर्टिसिलियम थिओब्रोमि) नावाच्या बुरशीमुळे केळ्यांवर काळी बोंडी (जळका चिरुट) रोग होतो. ह्याचे वहन निरोगी पेशींवर वाऱ्याने किंवा पावसाचे थेंब उडण्याने होते. पावसाळ्यात फुलधारणेच्या काळात ही बुरशी केळीच्या पिकावर हल्ला करते व झाडाला केळीच्या फुलांद्वारे संक्रमित करते. तिथुन ती नंतर फळाच्या टोकाला पोचते आणि कोरडे सडणे घडविते जे चिरुटाच्या राखेसारखे दिसते, म्हणुन हे सामान्य नाव पडलेले आहे. सामान्यत: संसर्ग फळे लागल्यानंतर पहिल्या काही दिवसातच आणि उबदार आर्द्र हवामानात विशेषतः उंच समुद्रसपाटीच्या व सावलीच्या क्षेत्रात केलेल्या लागवडीमध्ये होतो.