Mycosphaerella sp.
बुरशी
दोन्ही सिगाटोका बुरशीचे प्राथमिक लक्षणे तिस-या किंवा चौथ्या उघडलेल्या नव्या पानांवर दिसतात. बारीक, फिकट पिवळे ठिपके (१-२ मि.मी.लांबीचे) पानाच्या वरच्या बाजुला पिवळ्या सिगाटोकामध्ये व लालसर तपकिरी ठिपके पानाच्या मागच्या बाजूला काळ्या सिगाटोकामध्ये दुय्यम शिरांना समांतर दिसतात. हे ठिपके नंतर मोठे होऊन अरुंद, तपकिरी किंवा गडद हिरवे, फिरकीच्या अकाराचे होतात. हे डाग आणखीन मोठे होऊन शिरांना समांतर आणि आयताकृती गंजलेल्या लाल ओळींमध्ये रुपांतरीत होतात व ह्या लाल ओळींभोवती पाणी शोषल्यासारखी पिवळी वलय (४-१२ मि.मी लांबीची) तयार होतात. ह्या लाल ओळींचे केंद्रे हळूहळू राखाडी तपकिरी ते गडद तपकिरी होतात जी करपण्याची लक्षणे असतात. पानाच्या कडेला ते एकत्र होऊन, पिवळ्या किनारीने वेढलेले काळे किंवा तपकिरी करपटलेले डाग दिसतात. पाने फाटल्याने जीर्ण दिसतात.
ट्रायकोडर्मा अॅट्रोविराइडवर आधारीत जैविक बुरशीनाशके जैविक नियंत्रणासाठी वापरल्यास ते संभवत: रोगाला आळा घालु शकतात आणि त्याची शेतातील वापरासाठी संभाव्य चाचणी केली जात आहे. छाटणी केलेल्या जागी बोर्डो मिश्रणाची फवारणी केल्यास या रोगाचा प्रसार छाटणी केलेल्या भागात खूप कमी होतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ज्या बुरशीनाशकात मँन्कोझेब, कॅलिक्झिन किंवा क्लोरोथॅलोनिल आहे ती रोग जास्त पसरलेला नसल्यास फवारणी द्वारे वापरली जाऊ शकतात. बुरशीनाशके जसे के प्रॉपिकोनॅझोल, फेनब्युकोनॅझोल किंवा अझोक्सीस्ट्रोबिन ही आलटून पालटून वापरल्यास चांगले परिणाम देतात. आलटून पालटून वापरल्याने बुरशीत ह्या बुरशीनाशाकांप्रती प्रतिरोध निर्माण होत नाही.
ह्या रोगाची लक्षणे मायकोस्फारेला म्युझिकोला या बुरशीमुळे उद्भवतात आणि जगभरात आढळतात. हा केळी पिकावरील सर्वात विध्वंसक रोगांपैकी एक आहे. बुरशी झाडांच्या जिवंत किंवा मृत पेशींत जगतात आणि बीजाणू तयार करतात जी वार्याने किंवा पावसाच्या थेंबांनी पसरतात. रोगाचा प्रसार करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे संक्रमित सजीव लागवड सामग्री, पाचोळा किंवा दूषित फळांची वाहतुक होय. या रोगाचा प्रादुर्भाव उंच भागात आणि थंड हवामानात किंवा उष्णकटिबंधाच्या जवळपास असणार्या भागात, पावसाळ्यात जिथे हवामान उबदार असते आणि सापेक्ष आर्द्रताही उच्च असते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बुरशीच्या चांगल्या वाढीसाठी २७ अंश चे तापमान अनुकूल असते आणि कोवळी पाने जास्त संवेदनशील असतात. हा रोग झाडाची उत्पादकता कमी करतो, ज्यामुळे गुच्छाच्या आकारावर परिणाम होतो आणि फळे पिकण्यास लागणारा कालावधी कमी होतो.