Corynespora cassiicola
बुरशी
सुरवातीला छोटे कोनेदार तपकिरी ठिपके जुन्या पानांवर दिसतात आणि हळुहळु ते वरपर्यंत जातात. रोग जसा वाढत जातो डागही मोठे होतात आणि फिकट तपकिरी होऊन गडद किनारीचे असतात आणि ह्या सर्वाला पिवली किनार असते. त्यांचे केंद्र नेक्रॉटिक होऊन गळुन पडते (बंदुकीने गोळी मारलेल्या भोकासारखे दिसते) ज्यामुळे पाने फाटल्यासारखी दिसतात. ओल्या हवेत, डाग चांगलेच मोठे होऊन एकमेकांत मिसळतात, ज्यामुळे तीराच्या निशाणासारखे दिसते. लंबवर्तुळाकार गडद तपकिरी डागसुद्धा देठांवर आणि फांद्यांवर दिसतात. बहुधा फळांवर लक्षणे दिसत नाहीत पण लांबलेल्या ओल्या हवेत काही वेळा खोलगट डाग दिसु शकतात.
सिलोन दालचिनीच्या तेलाचा अर्क (०.५२युएल / मि.ली.)चा वापर करुन पानांवरील व्रणांचे माप आटोक्यात आणता येते. फळांना लागण होण्यापूर्वी पिकावर उपचार करणे गरजेचे आहे, नाहीतर उपचाराचा काहीही परिणाम होणार नाही.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर लक्षणे खूप गंभीर असतील तर मँकोझेब, कॉपर किंवा क्लोरोथॅलोनिल असणार्या बुरशीनाशकांचा वापर ह्या रोगाचे नियंत्रण करण्यात मदत करतो उदा. खूपच पाने सडत असतील. काही बेंझामिडॅझोल बुरशीनाशकाबाबत प्रतिरोध दिसुन आला आहे.
कॉरिनेस्पोरा कॅसिल्कोला नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. हा सामान्यपणे उष्ण कटिबंधात आणि आजुबाजुच्या प्रदेशात होतो. हा जंतु मुख्यत्वेकरुन टोमॅटो आणि काकडीला लागण करतो आणि क्वचितच पपयांवरही आढळतो. ह्याचा प्रसार बीजांडांद्वारे होतो जे पानांच्या खालच्या बाजुला विकसित होतात. बीजांडे वार्याबरोबर आणि पावसाबरोबर रोपारोपांवर वाहुन जातात. ओल्या, आद्र हवेत ह्याची लागण जास्त होते. पाने खूपच सडतात ज्यामुळे पिकाचे नुकसान होते आणि फळांची प्रत कमी होते. ह्याचे दुय्यम यजमान पुष्कळ प्रकारचे तण तसेच अॅव्हॅकॅडो, ब्रेडफ्रुट, कॅसाव्हा, सोयाबीन किंवा वांगी आहेत.