आंबा

करपा / खार रोग

Peyronellaea glomerata

बुरशी

थोडक्यात

  • जुन्या पानांवर ओबड धोबड पिवळे ते तपकिरी डाग येतात.
  • कालांतराने हे डाग मोठ्या धब्ब्यात रुपांतरीत होतात ज्याची केंद्रे राखाडी करपट असतात.
  • पाने सुकतात आणि अखेरीस पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते


आंबा

लक्षणे

फोमा ब्लाइटच्या लागणीची लक्षणे फक्त जुन्या पानांवरच दिसतात. संसर्ग झालेल्या संपूर्ण पानावर कोनेदार, पिवळे ते तपकिरी अनियमित डाग पसरलेले दिसतात. कालांतराने हे डाग मोठ्या धब्ब्यात रुपांतरीत होतात ज्याचे केंद्र राखाडी करपट असुन त्यांचे कडा खूप गडद असतात. शेवटच्या काळात पाने सुकतात आणि पानगळ ही होते. द्राक्षे (व्हिटिस व्हिनिफेरा) आणि केंटूस्की गवत (पोआ प्रॅन्टेसिस) हे ह्या रोगाचे पर्यायी यजमान आहेत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पहिले लक्षण दिसताच कॉपर ऑक्झिक्लोराइड (०.३%) ची फवारणी केल्याने आणि नंतरची फवारणी २० दिवसांच्या अंतराने केल्याने ह्या रोगावर नियंत्रण मिळविता येते. फळांना निंबोळी अर्काची फवारणी केल्याने व वातानुकुलीत साठवण केल्याने साठवणीच्या काळातील फळांवरील बर्‍याचशा जंतुंची वाढ थांबविता येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लक्षणे दिसल्याबरोबर बेनोमिल (०.२%) असणारे बुरशीनाशक फवारल्याने आणि नंतर मिल्टॉक्स ०.३% २० दिवसांच्या अंतराने फवारल्याने ह्या बुरशीला चांगले नियंत्रणात ठेवता येते.

कशामुळे झाले

फोमा ब्लाइट हा नवा रोग आहे पण आंबा लागवडीच्या क्षेत्रात सध्या तो आर्थिक महत्वाचा होत आहे. पेरोनेले ग्लोमेराटा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, ज्याला पुर्वी फोमा ग्लोमेराटा म्हटले जायचे, म्हणुन रोगाचे फोमा ब्लाइट हे सामान्य नाव पडले आहे. ही एक सर्वव्यापी आणि बहुतेक ठिकाणी सापडणारी बुरशी आहे जी जमिनीत आणि बरेचशा मृत व जिवंत झाडाच्या भागात (बिया, फळे, भाज्या) बहुधा कोणतेही लक्षण न दर्शविता रहाते. हिला बंदिस्त जागेतही पाहिले जाऊ शकते जसे कि लाकुड, सिमेंट, तैलरंगाने रंगविलेले पृष्ठभाग आणि कागद. ह्या बुरशीला इतर रोगांमुळे होणारी दुय्यम लागण असे समजले जाते. तरीपण काही यजमान आणि काही ठराविक हवामानाच्या परिस्थितीत (ओली हवा आणि वाढलेले तापमान) ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. २६ ते ३७ डिग्री सेल्शियस तापमानात ह्या रोगाची वाढ सगळ्यात जास्त होते.


प्रतिबंधक उपाय

  • साठवणीच्या काळात बुरशीची लागण टाळण्यासाठी साठवणीची जागा पूर्णपणे स्वच्छ करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा