Botryosphaeria rhodina
बुरशी
बोट्रियोस्फेरिया बुरशीचा आंब्याच्या झाडाला झालेला संसर्ग सुकलेल्या फांद्यातुन प्रदर्शित होतो आणि ह्यामुळे पूर्ण पानगळही होऊ शकते. सुरुवातीच्या काळात झाडाचे खोड रंगहीन होऊन काळसर पडते. नंतर नविन फांद्या बुडापासुन वरपर्यंत जोपर्यंत पानांवर परिणाम होत नाही तोपर्यंत सुकायला लागतात. जशा पानांच्या शिरा तपकिरी होतात तशी पाने वरच्या बाजुला गुंडाळली जातात आणि अखेरीस गळतात. शेवटच्या काळात लहान आणि मोठ्या फांद्यांतुन चिकट स्त्राव पाझरतो. सुरवातीला चिकट स्त्रावाचे थेंब दिसतात, पण जसा रोग वाढतो तशी पूर्ण फांदी किंवा खोडही ह्या चिकट स्त्रावाने भरुन जाते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाची साल किंवा पूर्ण फांदी सुकते आणि चिर पडुन फाटते.
झाडाचे बाधीत भाग काढुन नष्ट करा. शेजारची निरोगी फांद्याही काढा ज्याने ह्या बुरशीचा पुरताच नायनाट होईल.
छाटणी केल्यानंतर कॉपर ऑक्झिक्लोराइड ०.३% ह्या प्रमाणात जखमांवर लावा. वर्षातुन दोन वेळा बोर्डो मिश्रण वापरल्याने झाडांवर ह्या संसर्गाचा दर कमी होतो. थायोफेनेट मिथाइल या बुरशीनाशकाची फवारणी बी. र्होनडिनाविरुद्ध परिणामकारक आढळून आलेली आहे. झाडाच्या सालीवरचे किडे (बीटल्स) किंवा छिद्रे पाडणारे सुरवंट यांच्या नियंत्रणासाठी बायफेनथ्रिन किंवा परमेथ्रिनचा वापर करा.
बोट्रयोस्फेरिया र्होहडिना झाडांच्या करपलेल्या भागात खूप काळापर्यंत जिवंत राहू शकतात. आंब्याच्या झाडाच्या खोडावर आणि फांद्यांवर झालेल्या जखमांतुन ही बुरशी आत प्रवेश करते. संसर्गाची तंतोतंत यंत्रणा अजुनही पूर्णपणे समजलेली नाही. शक्यता आहे कि ही बुरशी किड्यांनी (बीटल्स) केलेल्या जखमांतुन किंवा शेतात काम करतेवेळी झालेल्या जखमातुन आत शिरकाव करते. संसर्गाचा प्राथमिक स्त्रोत फांदीच्या मेलेल्या सालीतील बीजाणू असु शकतात. ते झाडांवर वाढीच्या काळात रहातात आणि पीक काढणीच्या काळात पसरतात. लोह, झिंक आणि मँगनिजची कमतरता ह्या रोगाची लागण होण्यास अनुकूल असतात. पाणी आणि गोठण्याचा ताण ह्याच्याशीसुद्धा ह्या रोगाचा संबंध आहे. वर्षातुन केव्हाही हा रोग होऊ शकतो पण बहुधा हा रोग वाढीच्या उशीराच्या टप्प्यावर होतो.