Oidium mangiferae
बुरशी
झाडाच्या संक्रमित भागांवर वैशिष्ट्यपूर्ण पांढरट, पावडरीसारख्या बुरशीची वाढ होत असलेले छोटे चट्टे दिसतात. जे नंतरच्या काळात मोठे होऊन जास्त जागा व्यापतात. जुन्या पानांच्या आणि फळांच्या संक्रमित भागांवर जांभळट तपकिरी छटा येते. नविन पाने आणि फुले पांढऱ्या बुरशीच्या बीजाणूनी पूर्णपणे आच्छादली जाऊन ती तपकिरी रंगाची होऊन सुकतात आणि अखेरीस करपतात. काही वेळा त्यांत विकृतीही दिसुन येते उदा. पाने खालच्या बाजुला मुडपणे. फळे पांढरट पावडरीने आच्छादीली जातात आणि सुरुवातीच्या काळात चिरा पडून खडबडीत जाड भाग दिसतात. संक्रमित फळे लहान आणि विकृत आकाराची होऊन परिपक्वपणापर्यंत पोहोचत नाही.
जैव बुरशीनाशके ज्यात बॅसिलस लिचेनिफॉरमिस आहे त्याची फवारणी केल्यास भुरीचा संसर्ग कमी होतो. अॅम्पेलोमायसेस क्विसक्वालिस नावाची परजीवी बुरशी हिची वाढ थांबविते असे आढळुन आले आहे. सल्फर, कार्बोनिक अॅसिड, नीम तेल, कोअॅनिन आणि अॅस्कॉर्बिक अॅसिडवर आधारीत औषधांची फवारणी केल्यास गंभीर प्रादुर्भाव टाळता येतो. शिवाय, दूध हे नैसर्गिक बुरशीनाशक आहे. ताक वापरुनही भुरीसारख्या बुरशीचे नियंत्रण करता येते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मोनोपोटॅशियम सॉल्टस, हायड्रोडिसल्फराइझ्ड केरोसिन, अॅलिफ़ॅटिक पेट्रोलियम द्राव, मँकोझेब आणि मायक्लोब्युटानिल असणारी बुरशीनाशके आंब्यावरील भुरीच्या नियंत्रणासाठी वापरली जाऊ शकतात. जास्तीत जास्त परिणामकारकता येण्यासाठी फुले येण्याआधी किंवा फुले येण्याच्या सुरवातीच्या काळात हे उपचार सुरु केले पाहिजेत. हे उपचार नियमितपणे ७-१४ दिवसांच्या अंतराने करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
दोन मोसमांच्या मध्ये ही बुरशी न उमललेल्या कळ्यांमध्ये किंवा जुन्या पानांवर विश्रांती घेते. झाडाचे खोड आणि मुळे वगळता इतर सर्व भाग ह्या बुरशीस संवेदनशील असतात. अनुकूल परिस्थितीत पानांखाली किंवा कळ्यांमध्ये विश्रांती घेत असलेल्या बुरशी कडुन बीजाणू सोडले जातात जे वाऱ्याने किंवा पावसाने इतर झाडांवर पसरतात. दिवसा गरम तापमान १० ते ३१ डिग्री सेल्शियस आणि रात्रीचे कमी तापमान ह्याबरोबर ६०-९०% आर्द्रता हे हवामान त्यांना चांगलेच भावते.