गहू

गव्हावरील कर्नल बंट

Tilletia indica

बुरशी

थोडक्यात

  • प्रत्येक ओंबीतील काही दाण्याचे बुड काळे पडते.
  • दाणे काळ्या भुकटी सारख्या पदार्थाने भरलेले असतात.
  • जर दाणे भरडले असता सडणार्‍या माशासारखा वास सुटतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

गहू

लक्षणे

सुरुवातीच्या टप्प्यात, ओंबीतील काही दाण्यांचे बुड काळे पडतात. हळुहळु दाण्यातुन आतला भाग रिकामा होतो आणि तो थोडा किंवा पूर्णपणे काळ्या भुकटी सारख्या पदार्थाने भरतो. दाणे भरत नसल्यामुळे कुस बहुधा तशीच दाण्यांना चिटकून राहते. जसे रोग वाढतो, इतर ओंबीवरील जास्त दाणे प्रभावित होतात. जर दाणे भरडले असता सडणार्‍या माशासारखा वास सुटतो. तरीपण प्रत्येक कणसातील ५-६ दाण्यांवरच काजळी धरते. संक्रमित झाड खुजी होऊ शकतात. या रोगाचा धान्योत्पादनावर कमी परिणाम होतो, परंतु गुणवत्तेच्या समस्येमुळे किंवा बीजाणूंच्या उपस्थितीमुळे बियाणे म्हणुन नाकारले जाऊ शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

टिलेशिया इंडिकाविरुद्ध कोणतेही सेंद्रिय उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कोणतीही बीजप्रक्रिया १००% परिणामकारक नाही पण बरेचसे उपचार बुरशीची वाढ आणि धान्याचे नुकसान कमी करतात. कार्बोक्सिन-थायरम, डायफेनोकोनाझोल, मेफेनोक्झाम किंवा टेब्युकोनाझोलवर आधारीत बुरशीनाशके शेतातील हवेद्वारे होणार्‍या संक्रमाणास परिणामकारकरीत्या संपवितात.

कशामुळे झाले

बियाणांत किंवा जमिनीत रहाणार्‍या टिलेशिया इंडिका नावाच्या बुरशीमुळे कर्नाल बंट होतो. बुरशी ४-५ वर्षांपर्यंत जमिनीत जिवंत राहू शकते. दूषित जमिनीत किंवा झाडांच्या अवशेषात असलेले बीजाणू निरोगी फुल आणि झाडांवर पसरतात. फुलधारणेच्या सर्व काळात संक्रमण होऊ शकते पण ओंबी लागण्याच्या वेळी जास्त संवेदनशील असतात. बुरशी वाढणार्‍या दाण्यात घर करते आणि हळुहळु त्यातील सामग्री रिकामी करते. लक्षणे विकसित होण्यात हवामान महत्वाचा घटक आहे. दाणे तयार होण्याच्या काळात आर्द्र हवामान (>७०%) आणि १८ ते २४ डिग्री सेल्शियसचे तापमान या रोगाच्या प्रगतीसाठी अनुकूल आहे. बीजाणूंचे वहन शेतीची अवजारे, हत्यारे, कपडे आणि गाड्यांद्वारेही होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • पर्यायी यजमानांना सभोवतालच्या शेतात लावणे टाळा.
  • ५ वर्षांपर्यंत यजमान नसणार्‍या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • बुरशीला अनुकूल असणार्‍या काळात ओंबी धरणार नाहीत असे गणित करुन पेरणीची वेळ ठरवा.
  • शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होईल या कडे लक्ष द्या आणि फुल धारणेच्या काळात जास्त पाणी देणे टाळा.
  • नत्रयुक्त खतांचा अतिरेक वापर टाळा.
  • दूषित शेतातुन यंत्र आणि माती दुसरीकडे नेऊ नका.
  • जमिनीचे तापमान वाढविण्यासाठी आणि बुरशी पसरण्यास आळा घालण्यासाठी जमिनीवर प्लास्टिकचे अच्छादन पसरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा