मका

मक्याच्या पानावरील उत्तरीय करपा

Setosphaeria turcica

बुरशी

थोडक्यात

  • पहिल्यांदा लक्षणे खालच्या पानांवर येतात.
  • गडद कडा असलेले मोठे, अंडाकृत, राखाडी किंवा फिकट तपकिरी २५ ते १५० मि.
  • मि आकाराचे ठिपके येतात.
  • रोगामुळे पाने वाळून गळतात.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

खालच्या पानांवर प्रथमत: बारीक, अंडाकृती, पाणी शोषल्यासारखे ठिपके लक्षणांच्या स्वरुपात दिसतात. जसजसा रोग वाढत जातो ते झाडाच्या वरच्या भागातही दिसु लागतात. जुने ठिपके हळुहळु गव्हाळ रंगात, चिरुटाच्या आकाराचे करपट डागात बदलतात ज्यांची किनार फिकट हिरव्या पाणी शोषल्यासारखी असते. हे ठिपके नंतर एकमेकात मिसळतात आणि पानाचे पात तसेच खोडाचा बराचसा भाग व्यापतात, ज्यामुळे झाडे वाळतात आणि आडवी होतात. जर संक्रमण झाडाच्या वरच्या भागात कणीस भरण्याच्या काळात झाल्यास उत्पादनात मोठी (७०%) घट होऊ शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा बॅसिलस सबटिलिसवर आधारीत जैविक बुरशीनाशकेही संक्रमणाची जोखिम कमी करण्यासाठी विविध टप्प्यांवर वापरली जाऊ शकतात. गंधकाचे द्रवण देखील चांगले परिणाम देते.

रासायनिक नियंत्रण

एकात्मिक दृष्टीकोन प्रतिबंधक उपायांबरोबरच काळजीपूर्व शेतीच्या चांगल्या सवयी वागविण्याची शिफारस करण्यात येते. लवकर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन केलेले बुरशीनाशकाचे उपचारही ह्या रोगास नियंत्रित करण्यासाठी एक प्रभावी मार्ग असू शकतो. अन्यथा, खालच्या झाडीवर लक्षणे दिसल्यानंतरच वरच्या झाडीचे आणि कणसांचे संरक्षण करण्यासाठी बुरशीनाशकांचा उपयोग केला जाऊ शकतो. अॅझोक्सिस्ट्रोबिन,पिकोक्सिस्ट्रोबिन,मँकोझेब, पायराक्लोस्ट्रोबिन, प्रोपिकोनाझोल, टेट्राकोनाझोल वर आधारीत फवारे वापरा. पिकोक्सिस्ट्रोबिन + सायप्रोकोनाझोल, पायराक्लोस्ट्रोबिन + मेटाकोनाझोल, प्रोपिकोनाझोल + अॅझोक्सिस्ट्रोबिन, प्रोथिकोनाझोल + ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबिनवर आधारीत बुरशीनाशके वापरा. बीज प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात येत नाही.

कशामुळे झाले

बुरशी जमिनीत किंवा झाडाच्या अवशेषात सुप्तावस्थेत रहाते. पाऊस, रात्री पडणारे दव, उच्च आर्द्रता आणि मध्यम तापमान या बुरशीच्या प्रसारास अनुकूल असते. बुरशीचे वहन वार्‍याने किंवा पावसाच्या उडणार्‍या पाण्याने जमिनीवरुन मक्याच्या कोवळ्या रोपांच्या खालच्या पानांवर होते. पावसाळी हवामान आणि शेतीच्या वाईट सवयींमुळे शेतात हिचा प्रसार एका रोपावरुन दुसर्‍या रोपावर होतो. वाढीच्या काळात जर १८ ते २७ डिग्री सेल्शियस तापमान असेल तर हा रोग जलद गतीने पसरतो. पाने ६-१८ तास ओली रहाणेही प्रसारासाठी गरजेचे आहे. ज्वारी हा बुरशीचा आणखी एक आवडता यजमान आहे.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • खत संतुलित प्रमाणात द्या आणि नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने नियमितपणे तण काढा.
  • जास्त उद्रेक होऊ नये म्हणुन सोयाबीन, चवळी किंवा सूर्यफुलांसोबत पीक फेरपालट करा.
  • खोल नांगरणी करा जेणेकरून झाडाचे अवशेष गाडले जातील आणि जमिनीतील संक्रमण कमी होईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा