भात

भातावरील तपकिरी ठिपके

Cochliobolus miyabeanus

बुरशी

थोडक्यात

  • कोवळ्या पानांवर गोल, पांढरे ते राखाडी केंद्र आणि तपकिरी करपट डाग येतात.
  • प्रौढ झाडांवर लालसर कडा असते.
  • खोड आणि पाने पिवळी पडुन मरगळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

या रोगाची लक्षणे बऱ्याच प्रकारचे असतात तथापि, पोटरी अवस्थेत गोल किंवा अंडाकृत पिवळी प्रभावळ असणारे तपकिरी ठिपके येणे ही संक्रमणाची सर्वात दृश्यमान चिन्हे आहेत. जसे हे ठिपके वाढतात तसे मध्यावर राखाडी व लालसर तपकिरी कडा असलेल्या ठिपक्यांमध्ये रुपांतरीत होतात. खोड रंगहीन पडणे हे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. संवेदनशील जातीत ठिपके ५-१४ मि.मी. लांबीचे असतात ज्यामुळे पाने वाळतात. प्रतिकारक वाणात ठिपके तपकिरी आणि सुईच्या टोकाच्या मापाचे असतात. फुलांत झालेल्या संक्रमणामुळे दाणे अपुरे किंवा विस्कळीत भरतात आणि दाण्यांची गुणवत्ता कमी होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बियाणे संक्रमित नाहीत याची खात्री करण्यासाठी त्यांना गरम पाण्यात (५३-५४ डिग्री सेल्शियस) १० ते १२ मिनीटे बुडविण्याची शिफारस करण्यात येते. परिणाम चांगले येण्यासाठी बियाणे ८ तास थंड पाण्यात ठेऊन मग गरम पाण्याचे उपचार करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांचा (उदा. आयप्रोडियोन, प्रॉपिकोनॅझोल, अॅझॉक्सिस्ट्रोबिन, ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन) वापर बीज प्रक्रियेसाठी करणे हा उत्कृष्ट प्रतिबंधक उपाय आहे.

कशामुळे झाले

कोचिलोबोलस मियाबियानस या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात. ही बुरशी चार वर्षांहून अधिक काळापर्यंत बियांमध्ये जिवंत राहू शकते आणि वायुजन्य बीजाणूद्वारे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरते. शेतात राहिलेले संक्रमित झाडाचे अवशेष आणि तण हे रोग पसरवण्यासाठी इतर सामान्य मार्ग आहेत. हा रोग पिकाच्या सर्व टप्प्यात येऊ शकते, परंतु संक्रमण सर्वात जास्त पोटरी पासुन परिपक्व अवस्थेपर्यंत होत असते. बहुतेकदा जमिनीतील गैर व्यवस्थापन मुख्यतः सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे हा रोग होतो. सिलिकॉनयुक्त खतांचा वापर करून तपकिरी ठिपक्यांचे नियंत्रण केले जाऊ शकते. शेणखत आणि रासायनिक खतांचे मिश्रण वापरल्याने या रोगाची तीव्रता काही प्रमाणात कमी होते. उच्च आद्रता (८६-१००%) आणी उच्च तापमान (१६-३६ डिग्री सेल्शियस) हे बुरशीला अनुकूल आहे.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • ज्या जमिनीत सिलिकॉन कमी असते, तिथे कॅल्शियम सिलिकेट स्लॅगचा वापर लागवडीपूर्वी करावा. शक्य झाल्यास प्रमाणित स्त्रोताकडील बियाणेच वापरा.
  • आपल्या भागात मिळत असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • संतुलित पोषकांचा पुरवठा मिळेल याची काळजी घ्या व जमिनीतील पोषक उपलब्धतेवर लक्ष ठेवा.
  • पोटरी अवस्थेपासून शेताचे रोगाच्या लाक्षांसाठी नियमितपणे निरीक्षण करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने चोख तण नियंत्रण करा.
  • काढणीनंतर संक्रमित झाडे काढुन, जाळुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा