Puccinia graminis
बुरशी
संक्रमण झाल्यानंतर ७-१५ दिवसात पहिली लक्षणे नजरेस पडतात. लालसर तपकिरी अंडाकृती ते लंबगोलाकार फोड खोड, पर्णकोष आणि कधीकधी फुलातही येतात. खोड आणि पर्णकोष मुख्यत: संक्रमित होतात. भुकटी सारखे फोड मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि बराच भाग व्यापतात ज्यामुळे कांड्यांची साल खडबडीत होते. जर संक्रमण गंभीर स्वरुपाचे असेल, तर खोडे कमकुवत होतात आणि जोराच्या वार्याने आणि पावसाने कोलमडतात. बुरशी पाण्याच्या आणि पोषकांच्या वहनात अडथळा आणते ज्यामुळे झाडाच्या सर्व भागांना पाणी पोचत नाही. झाडाचा जोम कमी होतो आणि दाण्यापर्यंत पोषण पोचत नाही. कमकुवत झालेले कांड्या इतर प्रकारच्या संसर्गास संवेदनशील होतात. दाणे पूर्ण भरण्याआधी जर रोग चांगला वाढलेला असला तर उत्पादनात मोठी घट होते.
प्युसिनिया ट्रिटिसिनाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. टेब्युकोनाझोल किंवा प्रोथियोकोनाझोल असणार्॔या बुरशीनाशकांचा वापर करुन बुरशीचे नियंत्रण केले जाऊ शकते. प्रतिबंधक उपायांसाठी, ट्रायाझोलस आणि स्ट्रोबिल्युरिनस असणार्या बुरशीनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. या बुरशीत स्ट्रोबिल्युरिनस विरुद्ध काही प्रमाणात प्रतिकार निर्माण झाल्याचे दिसुन आले आहे.
प्युसिनिया ग्रामिनिस नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात जी बंधनकारक असुन तिला जगण्यासाठी जिवंत झाडांच्या भागांची गरज लागते. बीजाणू वार्याबरोबर खूप लांब अंतरावर वाहुन जातात आणि पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर उगवतात. यंत्र, गाड्या, हत्यारे, कपडे आणि पायताणे याद्वारेही वहन होऊ शकते. बुरशी पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन झाडात शिरते आणि यासाठी कमी प्रकाश (पहाटे किंवा संध्याकाळी) तसेच पाने वारंवार दव पडल्याने किंवा पावसामुळे फार काळ ओली रहाणे हे अनुकूल असते. खोडावरील तांबेर्याला गरम दिवस (२५-३० डिग्री सेल्शियस) आणि कमी गरम रात्री (१५-२० डिग्री सेल्शियस) ज्यामुळे दव पडु शकते हे फार भावते. हा रोग सामान्यपणे फक्त गव्हावरच येतो पण इतर झाडे जसे तृणधान्य, गवतांचे प्रकार आणि बरबेरीज झुडपांच्या जाती याचे वहन करु शकतात किंवा याने संक्रमितही होऊ शकतात.