भात

भातावरील करपा

Magnaporthe oryzae

बुरशी

थोडक्यात

  • गडद कडांसह फिकट डाग पानांवर येतात.
  • पेऱे देखील प्रभावित होऊ शकतात.
  • फांद्या मोडतात.
  • कोवळी रोपे मरतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

भातावरील करपा झाडाच्या जमिनीवरील प्रत्येक भागावर: पान, पेरा, बुंधा,ओंब्यांचे भाग,काही वेळा पर्णकोषावर देखील परिणाम करतो. पाने पिवळ्या ते फिकट हिरव्या चकतीसारखे किंवा डोळ्याच्या आकाराचे टोकदार ठिपके दर्शवतात. हे डाग गडद करपट कडांसह राखाडी ते पांढरे केंद्र असलेले असतात. डांगांचे आकार, अनेक घटकांवर जसे की झाडाचे वय, वाण व संक्रमणाची वेळ यावर अवलंबून असतात. जसे हे डाग वाढतात तशी पाने हळुहळु सुकून जातात. खोड आणि पान जोडणारा भाग संक्रमित असल्यास शेंडे कूज दिसू शकते आणि या जोडावरील पाने वाळतात. पेऱे देखील प्रभावित होतात. ह्यामुळे पेरे तपकिरी पडून तुटतात व काही वेळा संपूर्ण झाडाची मर देखील होऊ शकते. वाढीच्या नंतरच्या टप्प्यावर पानांवर गंभीर करपा झाल्यास पानांचा भाग कमी होतो आणि परिणामी दाणे भरण्यात आणि उत्पादनावर परिणाम होतो. हा भातावरील सर्वात विध्वंसक रोगांपैकी एक आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

आजतागायत या रोगाविरुद्ध कोणतेही जैविक नियंत्रण बाजारात उपलब्ध नाही. स्ट्रेप्टोमायसेस किंवा स्युडोमोनास जिवाणूंवर आधारीत उत्पादांची बुरशी आणि रोगाच्या घटना/प्रसारावर व्यवहार्यता तपासण्यासाठी प्रयोग चालू आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थायरमचे बीजोपचार या रोगाविरुद्ध परिणामकारक असतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी अॅझोझोक्सीस्ट्रोबिन किंवा ट्रायाझोल किंवा स्ट्रोबिल्युरिन गटातील सक्रिय घटक असलेली बुरशीनाशके रोपावस्थेत, फुटवे येते वेळेस आणि ओंबी धारणेच्या काळात फवारली जाऊ शकतात. बुरशीनाशकांच्या एक किंवा दोन फवारण्या ओंबी लागण्याच्या सुमारास केल्यास या रोगावर उत्तम नियंत्रण मिळू शकते.

कशामुळे झाले

मॅग्नापोर्थे ग्रिशिया नावाच्या बुरशीमुळे भातावरील करप्याची लक्षणे उद्भवतात, जो भातावरील सर्वात विनाशक रोग आहे. शेती व्यवसायातील इतर महत्वाच्या धान्य पिकांना जसे कि गहू, राय, जव आणि बाजरीला संसर्गित करु शकते. काढणीनंतरही वाळलेल्या अवशेषात ती फार काळ जगु शकते आणि म्हणुन पुढच्या हंगामात देखील लागण करते. जशी रोपे पक्व होतात तशी या जंतुंना ती कमी संवेदनशील होतात. भातावरील करप्याला थंड हवामान, वारंवार पाऊस आणि जमिनीतील कमी आर्द्रता अनुकूल असते. पाने खूप काळ ओली रहाणे हे लागण होण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. उंच भागातील भात शेतीत (ज्या जागी दिवस आणि रात्रीच्या तापमानात फारच फरक असतो) दवामुळे जास्त संक्रमाणाची जोखिम असते. अखेरीस ज्या जमिनीत उच्च नत्राची पातळी किंवा सिलिकॉनची पातळी कमी असते तिथे संक्रमणाची शक्र्यता जास्त असते.


प्रतिबंधक उपाय

  • रोग प्रतिकारक व निरोगी बियाणे वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • मोसमात लवकर (पावसाळ्याच्या सुरुवातीला) पेरणी करा.
  • नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा आणि नत्रयुक्त खते दोन किंवा तीन भागात विभागुन द्या.
  • पाण्याचा ताण टाळा.
  • भाताच्या शेतात पाणी सतत साचू द्या आणि पाण्याचा निचरा टाळा.
  • तण आणि पर्यायी यजमानांचे नियंत्रण करा.
  • जर जमिनीत सिलिकॉनची कमतरता असेल तर सिलिकॉन खते द्या.
  • सिलिकॉनच्या स्वस्त स्रोतामध्ये भाताचे सिलिकॉन जास्त असलेल्या वाणांची वाळलेली पाने समावेशीत आहेत. लक्षणांसाठी पिकाचे नियमित निरीक्षण करत चला.
  • पुढील हंगामात बुरशीचा प्रसार होऊ नये म्हणुन संक्रमित रोपांचे सर्व अवशेष नष्ट करा.
  • लोकसंख्या कमी करण्याचा प्रभावी आणि सोपा मार्ग आहे पीक फेरपालट.

प्लँटिक्स डाऊनलोड करा