भुईमूग

भुईमुगावरील तांबेरा (रस्ट)

Puccinia arachidis

बुरशी

थोडक्यात

  • पहिल्यांदा तांबट फोड पानांच्या खालच्या बाजुला दिसतात.
  • खूपच बाधीत पाने दोन्ही बाजुंनी तांबट फोडांनी भरुन जातात.
  • पाने अखेरीस पिवळी पडतात आणि शेवटी आक्रसतात.
  • पानगळती आणि पिकाचे भरपूर नुकसान होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भुईमूग

लक्षणे

भुईमुगावरील तांबेरा बहुतेक वेळा पानांच्या खालच्या बाजुला छोट्या गोल नारिंगी तपकिरी (तांबट) फोडांसारखा दिसतो. ह्याच्या बाजुने बहुधा पिवळी प्रभावळ दिसते. ह्यामुळे पानांची आणि रोपाची वाढ खूपच खुंटते. जसजसा रोग वाढतो, खूपच बाधीत पाने दोन्ही बाजुंनी तांबट फोडांनी भरुन जातात, पिवळी पडतात आणि "तांबट" दिसतात आणि शेवटी आक्रसतात. लांबट लालसर तपकिरी ( आणि नंतर काळे ) पडणारे फोड देठांवर, फांद्यांवर आणि पानांच्या देठांवरही दिसु लागतात. ह्यानंतर पानगळती होऊ शकते. रोगामुळे शेंगा फारच छोट्या आणि झाडोरा फारच कमी आणि दाण्यातील तेलाची प्रत कमी असते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

संसर्गास आळा घालण्यात जैव एजंटसमदत करतात. सॅल्व्हिया ऑफिशिनॅलिस आणि पोटेनटिला इरेक्टा रोपांचा अर्क पानांवरील बुरशीच्या वाढीवर परिणामकारक असतो. इतर रोपांचे अर्क जसे कि फ्लॅक्स सीड तेल आणि शेंगदाण्याचे तेलही रोगाच्या घटना कमी करण्यात परिणामकारक असते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगाच्या पुढच्या टप्प्यावर रसायनिक उपचार कामाचे नसतात. जर बुरशीनाशकांची गरज लागली तर उत्पाद ज्यात मँकोझेब, प्रॉपिकोनाझोल किंवा क्लोरोथॅलोनिल आहे (३ग्रॅ/ली) ते फवारावेत. संसर्गाचे पहिले लक्षण दिसताच वापर सुरु करावा आणि १५ दिवसांनी परत वापरावे.

कशामुळे झाले

भुईमुगावरील तांबेरा पिकाच्या जमिनीवरील पाल्यापाचोळ्यात किंवा इतर डाळिंच्या रोपाच्या भागात जे पर्यायी यजमान म्हणुन काम करतात, रहातो. इथे तयार झालेली बीजांडे खालील पानांवर पडुन प्राथमिक संक्रमण होते. दुय्यम प्रसार होतो बीजांडांचे वार्‍याने वहन होऊन. हवामान बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्यास बाधीत ठिपकेफारच लवकर वाढतात उदा. उबदार तापमान (२१ ते २६ डिग्री सेल्शियस) आणि ओले ढगाळ वातावरण (धुके किंवा रात्रीत खूप पडणारे दव). ह्यामुळे रोपांच्या कोंबांची आणि मुळांची वाढही खुंटते, ज्यामुळे रोपे खुजी होतात. जमिनीतील स्फुरदाचे उच्च केंद्रीकरण ह्या तांबेर्‍याच्या विकासाचा दर कमी करते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • प्रतिरोधक बियाणांचे प्रकार वापरा.
  • झाडांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन झाडांमधली उच्च आद्रता टाळा.
  • तण आणि आपोआप आलेली रोपे शेतातुन आणि आजुबाजुने काढुन टाका.
  • पर्यायी यजमान शेताच्या जवळ लावणे टाळा.
  • स्फुरद खताचा वापर खूप प्रमाणावर करा ज्याने तांबेर्‍याची वाढ हळु होईल.
  • बाधीत रोपे आणि रोपांचा कचरा काढुन जाळुन किंवा खूप खोल खणुन गाडुन नष्ट करा.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर दर तीन किंवा चार वर्षांनी पीक फिरवणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
  • एकामागुन एक भुईमुगाचे पीक घ्यायचे असल्यास मधुन मधुन जमिन पडिक सोडा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा