भुईमूग

लवकर आणि उशीरा येणारे पानांवरील ठिपके

Mycosphaerella

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर लवकर आणि उशीरा येणार्‍या ठिपक्यांचे वैशिष्ट्य आहे तपकिरी किंवा गडद डाग ह्या दोन्ही बाबतीत पिवळी प्रभावळ असते.
  • पाने अखेरीस गळतात आणि फांद्या आणि देठ कमजोर होतात.
  • पानगळतीमुळे रोपे कमजोर होतात आणि त्यांची उत्पादकता कमी होते.
  • बाधीत देठ कापणीच्या वेळी हिसड्यांनी तुटतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भुईमूग

लक्षणे

पानांच्या दोन्ही बाजुंना गोलाकार ठिपके दिसतात. लवकर येणार्‍या ठिपक्यांचे वैशिष्ट्य आहे फिकट तपकिरी गुळगुळीत व्रण, ज्यांना पिवळी प्रभावळ असते. उशीरा येणार्‍या ठिपक्यांचे वैशिष्ट्य आहे खडबडीत गडद तपकिरी किंवा काळे व्रण आणि प्रभावळ बहुधा नसते. जसजसा रोग वाढत जातो, डाग गडद आणि मोठे (१० मि.मी. पर्यंत) होतात आणि झाडाच्या वरच्या भागातील पानांवर, फांद्यावर आणि देठांवरही दिसु लागतात. लवकर येणार्‍या ठिपक्यांच्या बाबतीत, रुपेरी केसांसारखी बुरशीची वाढही काही वेळा पानाच्या वरच्या भागात दिसु शकते. जर वातावरण अनुकूल असेल तर पाने अखेरीस गळतात आणि फांद्या आणि देठ कमजोर होतात. पानगळतीमुळे रोपांचा जोम आणि उत्पादकता कमी होते. पिकाचे नुकसान वाढते कारण बाधीत देठ कमजोर होतात आणि कापणीच्या वेळी हिसड्यांनी तुटतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बुरशीविरोधक जंतु बॅसिलस सरक्युलान्स आणि सेराशिया मारचेसेन्स पानांना लावुन भुईमुगाच्या पानांवर उशीरा येणार्‍या ठिपक्यांच्या घटना कमी केल्या जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्लोरोथॅलोनिल, टेब्युकोनाझोल, प्रोपिकोनाझोल अॅझोक्सिस्ट्रोबिन, पायराक्लोस्ट्रोबिन, फ्ल्युक्झॅस्ट्रोबिन किंवा बॉस्कॅलिड असणार्‍या बुरशीनाशकांचा वापर पानांवरील फवार्‍यात वापरुन दोन्ही रोगांचे नियंत्रण केले जाऊ शकते. उदा. मँकोझेब ३ ग्रॅ/ली किंवा क्लोरोथॅलोनिल ३ ग्रॅ/ली चे फवारे पहिले लक्षण दिसताच आणि गरज भासल्यास १५ दिवसांनी परत एकदा फवारावे.

कशामुळे झाले

लवकर आणि उशीरा येणारे ठिपके हे वेगवेगळे रोग आहेत पण लक्षणे सारखीच आहेत जी रोपाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर दिसतात म्हणुन ही नावे. मायकोस्फारेला अॅराकिडीस (लवकर येणारे ठिपके) आणि मायकोस्फेरेला बरकेलेयी (उशीरा येणारे ठिपके) नावाच्या बुरशीमुळे हे रोग होतात. ह्या रोगाचा सध्यातरी माहित असलेला यजमान फक्त भुईमुगाची रोपेच आहेत. लागण होण्याचा मुख्य स्त्रोत आहे पूर्वीच्या भुईमुगाच्या पिकाचे अवशेष. फार काळासाठी उच्च आद्रता (दव), जास्त पाऊस (किंवा फवारा सिंचन) आणि गरम तापमान (२० डिग्री सेल्शियसच्या वर) संसर्गास उत्तेजन देते आणि रोगास वाढविते. लवकर आणि उशीरा येणारे ठिपके हा जगभरातील भुईमुगावर येणारा सगळ्यात गंभीर रोग आहे ज्यामुळे एकट्या किंवा एकत्रित रोगाने शेंगांचा खूपच नाश होतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात उपलब्ध असलेले प्रतिरोधक प्रकारचे बियाणे वापरा.
  • सहज आलेली भुईमुगाची रोपे शेतातुन आणि आजुबाजुने काढुन टाका.
  • जेव्हा रोपे ओली असतात तेव्हा शेतात काम करु नका.
  • पुरेशा पाण्याने सिंचन करा पण जास्त पाणी देऊ नका ज्यामुळे झाडोरा आणि जमिनीचा वरचा स्तर कोरडा राहील.
  • यजमान नसणार्‍या पिकांबरोबर पीक फिरवणी करा.
  • बाधीत रोपांची पाळेमुळे कापणीनंतर काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा