मका

कणसावरील काजळी

Sphacelotheca reiliana

बुरशी

थोडक्यात

  • कणसांवर दाण्यांऐवजी काही भाग किंवा संपूर्ण कणीस काळ्या भुकटी सारख्या बुरशीने आच्छादित होतात.
  • कणिस किंवा फुलोऱ्याच्या बुडाजवळ विचित्र पानांसारखी रचना दिसुन येते.
  • संक्रमित कणिस गोल किंवा थेंबाच्या आकाराची असतात आणि पूर्णपणे काळ्या भुकटी सारख्या पदार्थाने भरलेली असतात.
  • कणसातील रोगट भाग रेषायुक्त व बीजाणूच्या समूहाने भरलेला असतो.
  • संक्रमित कणसात स्त्रीकेसर किंवा दाणे नसतात.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

प्राथमिक लक्षणे झाडाच्या वाढीच्या नंतरच्या काळात जेव्हा फुलांचे गुच्छ येतात किंवा कणसे लागतात तेव्हा दिसतात. ओंबी काही भागात किंवा पूर्णपणे काळ्या भुकटी सारख्या बुरशीने आच्छादली जाते. पानासारखी विचित्र रचना फुलांच्या गुच्छावर किंवा कणसांवर दिसते. संक्रमित कणसे निरोगी कणसांपेक्षा गोलाकार असतात आणि पूर्णपणे काळ्या भुकटीसारख्या बुरशीने भरलेली असतात. कणसातील रोगट भाग रेषायुक्त व बीजाणूच्या समूहाने, जे रोपाच्या भागांचे टणक अवेशेष असतात त्यांनी भरलेला असतो. संक्रमित कणसात स्त्रीकेसर किंवा दाणे नसतात. खूप फांद्या येणेही दुय्यम लक्षण म्हणून वर्णन केले गेले आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

नत्रापेक्षा कार्बनचे प्रमाण असलेल्या शेणखताचा वापर हा रोगाचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. या बुरशीला खाणारे बीटल्स (फॅलाक्रस ऑब्स्क्युरस आणि लिस्ट्रोनिकस कोरुलियस) चा वापर जैव नियंत्रक एजंटस म्हणुन करता येतो. बॅसिलस मेगाटेरियम पासुन बनविलेले जीवाणू अर्काला बीज प्रक्रियेमध्ये वापरल्यासही या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

रासायनिक नियंत्रण

अंतरप्रवाही बुरशीनाशकांची (कार्बोक्झिन) बीज प्रक्रिया केल्याने बुरशीचा प्रतिबंध पहिल्यांदा होतो पण यामुळे फक्त सिमीत नियंत्रण राखता येते. रोपावस्थेत चारांमध्ये बुरशीनाशकांचे उपचार केल्यास परिणामकारक असतात पण आर्थिकरीत्या व्यवहार्य नसु शकतात.

कशामुळे झाले

स्फॅसेलोथेका रिलियाना नावाची बुरशी बीजाणूच्या रुपात जमिनीत खूप वर्षांपर्यंत राहू शकते आणि विशेषत: मुळांद्वारे पसरते. ही बुरशी तुरळकपणे शेतातील काही झाडांवर संक्रमण करते खासकरुन रोपावस्थेत . ही बुरशी कालांतराने फुलोरा आणि कणसासकट झाडाच्या सर्व भागात संक्रमण करते. ही काळ्या काणीच्या वाढीसारखी (बीजाणूचे गुच्छ) दिसते जी कणसातील रेशमी केस खाते आणि दाण्यांची जागा घेते. ही प्रदूषित शेतीउपयोगी अवजारांद्वारे एका शेतातुन दुसऱ्या शेतात प्रसारित होऊ शकते. जमिनीतील कमी ओलावा, उष्ण हवामान (२१ ते २७ डिग्री सेल्शियस) आणि पोषकांची कमतरता हे संक्रमण आणि रोगाच्या वाढीला अनुकूल आहेत. एकदा का संक्रमण झाले कि मग संक्रमित झाडांचे नुकसान कमी करण्यासाठी कोणतेही परिणामकारक उपचार नाहीत.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण वापरा.
  • लवकर पेरणी करा.
  • रोपांची जलद वाढ असणारे वाण लावा.
  • शक्य असल्यास उथळ पेरणी करा.
  • नियमित सिंचन करा आणि जमिन कोरडी होऊ देऊ नका.
  • शेतात स्वच्छता राखा.
  • संक्रमित झाड काढुन जाळुन टाका ज्याने बीजाणूचा प्रसार होणार नाही.
  • पुरेसे नत्र व पालाश यावर जोर देऊन मातीची चांगली सुपिकता सुनिश्चित करा.
  • पीक घेतल्यानंतर झाडांचे अवशेष काढुन टाका.
  • चार वर्ष किंवा जास्त काळासाठी यजमान नसलेल्या पीकांसोबत पीक फेरपालट योजना आखा आणि ज्वारीचे पर्यायी यजमान टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा