कांदा

पांढरी मुळकुज

Stromatinia cepivora

बुरशी

थोडक्यात

  • शेंड्याकडून पाने पिवळी पडून पात सुकायला सुरुवात होते.
  • पातेच्या बुडा जवळ कापसासारख्या पांढर्‍या बुरशीत काळे छोटे ठिपके दिसतात.
  • मूळ नाश होतो.
  • फांद्यांची व कंदाची वाढ खुंटते.
  • रोपे कोलमडुन मरतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
लसुण
कांदा
वाटाणा

कांदा

लक्षणे

रोगाची लागण वाढीच्या कोणत्याही काळात होऊ शकते पण बहुधा लक्षणे पहिल्यांदा जुन्या पातीवरच दिसतात. शेंड्याकडून पात पिवळी पडून बुडापर्यंत पोहोचणे हे ह्या रोगाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. नंतर संपूर्ण पात सुकुन मर होते. जेव्हा वरील लक्षणे पातीवर आढळतात त्याचा अर्थ बुरशीचे संक्रमण कंद, मूळ व बुडावर या आधीच झालेले असते. बुडाजवळ पांढऱ्या बुरशीची वाढ आढळून आल्यास मुळकुज झाली आहे असे समजावे. पात उपटल्यास जर कंदावर पांढर्‍या बुरशीची वाढ निदर्शनात आल्यास रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेले आहे असे समजावे. बारीक गोलाकार काळे ठिपके पांढर्‍या बुरशीत दिसतात. मुख्य मुळे हळुहळु पूर्णपणे कुजून नाहीशीही होऊ शकतात. दुय्यम मुळे कदाचित विकसित होऊन समांतर वाढतात, ज्यामुळे बुरशीला इतर रोपांच्या मुळांपर्यंत जाण्यासाठी मार्ग निर्माण होतात. रोपे काही दिवसात किंवा अठवड्यातच जमिनदोस्त होतात. ह्यावरुनच या रोगाची लक्षणे शेतात गटा गटाने का आढळून येतात ते स्पष्ट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जैव पद्धतीने बऱ्याच पातळ्यांवर मुख्यत: अँटागोनिस्टक बुरशीचा वापर करुण नियंत्रण करता येऊ शकते. उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा, फ्रयुजारियम, ग्लिओक्लॅडियम किंवा चेटोमियम अशा बर्‍याच परजीवी बुरशीचा वापर करुन पांढर्‍या बुरशीची वाढ कमी करता येऊ शकते. इतर बुरशी उदा. ट्रायकोडर्मा हरझियानम, टेराटोस्पर्मा ऑलिगोक्लॅडम किंवा लॅटरिस्पोरा ब्रेव्हिरामासुद्धा परिणामकारक आहेत. शेत मोकळे असताना लसणीच्या अर्काचे उपचारही बुरशीच्या वाढीला आणि बीजाणू तयार करण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी केला जाऊ शकतो व यामुळे नंतरच्या हंगामात हा रोग होण्याची शक्यता कमी होते. लसूण सोलुन ठेचुन १० ली. पाण्यात मिसळून दर २ चौरस मिटर क्षेत्रात शिंपडावे. ह्या बुरशीच्या वाढीसाठी १५-१८ डिग्री सेल्शियस तापमान अनुकूल असल्याकारणाने शक्यतो हे उपचार या हवामान परिस्थितीत करणे गरजेचे आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. खासकरुन पांढर्‍या मुळकुजीसाठीच्या सेंद्रिय आणि कल्चरल पद्धतींत संसर्ग खूपच कमी होतो. विशेषत: पांढरी मुळकुजच्या बाबतीत उत्कृष्ट लागवड पद्धत आणि जैविक नियंत्रण पद्धतींमुळे संक्रमणाचे व्यवस्थितरीत्या नियंत्रण करता येऊ शकते. जर बुरशीनाशकांची गरज लागलीच तर टेब्युकोनॅझोल, पेन्थियोपायरॅड, फ्ल्युडियोक्झॉनिल किंवा ईपरोडियोन असणार्‍या उत्पादांचा वापर जमिन तयार करतेवेळी किंवा फवारणीद्वारे लागवडी नंतर केला जाऊ शकतो. वापरण्याची पद्धत बुरशीनाशाकामध्ये असलेल्या सक्रिय घटकांवर आधारित असते त्यामुळेच ते तपासुन मगच वापर करावा.

कशामुळे झाले

स्केरोटियम सेपिवोरम नावाच्या जमिनीतील बुरशीमुळे पांढरी मुळकुज होते. शक्यतो रोगाची लागण जमिनीतून होते व सुप्तावस्थेतील ही बुरशी जमिनीत वीस वर्षांपर्यंत जिवंत राहू शकते. रोगाची तीव्रता जमिनीतील बुरशीच्या प्रमाणावर अवलंबुन असते. एकदा प्रादुर्भाव झाल्यास ह्या बुरशी पासुन सुटकारा मिळणे अतिशय कठिण आहे. ह्यांचे जीवनचक्र आणि विकासाला अॅलियम मुळांचा अर्क अनुकूल आहे. थंड तापमान (१०-२४ डिग्री सेल्शियस) आणि जमिनीतील ओलावा ह्यांच्याशी ह्या रोगाचे अवतरण संबंधित आहे आणि ह्याचे पसरणे जमिनीखालील बुरशीचे जाळे, साठलेले पाणी व शेतीउपयोगी अवजारे यांच्यावर आधारित आहे. पांढरी मुळकुज हा कांदा पिकावरील प्रमुख रोग असून ह्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते. संक्रमित शेतात वापरलेली अवजारे निर्जंतुकीकरण करुनच दुसऱ्या क्षेत्रात वापरावीत.


प्रतिबंधक उपाय

  • कमी संवेदनशील प्रकारचे वाण उदा.
  • लाल कांद्यांची लागवड करा.
  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • लागवड करतेवेळेस मुळापाशी पांढर्‍या बुरशीची काही लक्षणे दिसतायत का ते तपासा.
  • जर प्रमाणित स्रोतांकडील माल उपलब्ध नसेल तर कंदांच्या लागवडी ऐवजी बियाणे वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
  • शेतात पाणी साचणे टाळून योग्य निचरा होत आहे हे सुनिश्चित करा.
  • नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करणे टाळा.
  • रोगाच्या लक्षणासाठी शेतात नियमित निरीक्षण करत चला.
  • संक्रमित रोपे काढुन जाळुन नष्ट करा.
  • ह्या बुरशीचा प्रसार टाळण्यासाठी संक्रमित रोपांना शेणखताच्या खड्यात टाकू नये.
  • शेतीउपयोगी अवजारे निर्जंतुकीकरण करूनच वापरावीत.
  • यजमान नसलेल्या पिकांसोबत पीक फेरपालट करावे.
  • खोल नांगरणी करून जमीन तापू द्यावी.

प्लँटिक्स डाऊनलोड करा