Phytophthora infestans
बुरशी
पानांच्या वरच्या बाजुने कडेला तपकिरीसर हिरवे ठिपके येतात व कालांतराने हे ठिपके एकत्र येऊन पानाचे मोठे भाग पूर्णपणे तपकिरी होतात. ओल्या वातावरणात पानाच्या खालच्या बाजूच्या ठिपक्यांवर राखाडी ते पांढर्या बुरशीची वाढ निर्माण होते ज्यामुळे आपल्याला निरोगी भाग सुकलेल्या भागांपासुन वेगळे असे सहज लक्षात येतात. जसजसा रोग वाढतो तसतशी पाने तपकिरी होऊन गोळा होतात आणि वाळतात. काही वेळा, खोडांवर, फांद्यांवर आणि देठांवर देखील बरेचसे पांढऱ्या बुरशीचे थर असणारे तपकिरी ठिपके येतात. फळांवर राखाडीसर हिरवे ते मळकट तपकिरी आणि सुरकुतलेले डाग दिसतात. ह्या डागांजवळील फळाचा गर कडक होतो.
आत्तापर्यंत तरी उशीरा येणार्या करप्याविरुद्ध कोणतेही प्रभावशाली जैविक नियंत्रण माहितीत नाही. ह्याचा रोगाचा प्रसार टाळण्यासाठी संक्रमित ठिकाणच्या आजुबाजुचीही झाडे लगेच काढुन नष्ट करा आणि संक्रमित झाडांना शेणखत तयार करण्यासाठी वापरु नका.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उशीरा येणाऱ्या करप्याच्या नियंत्रणासाठी मँडीप्रोपॅमिड, क्लोरोथॅलोनिल, फ्ल्युयाझिनॅम, मँकोझेब सारखी बुरशीनाशके वापरू शकता. पावसाची शक्यता असेल त्या काळात किंवा तुषार सिंचन वापरले जात असताना जर रोग लागला तर बुरशीनाशकांची गरज भासु शकते.
मध्य उन्हाळ्यात संक्रमाणची जोखिम जास्त असते. झाडाला झालेल्या जखमांतुन आणि फाटलेल्या सालीतुन बुरशी आत प्रवेश करते. तापमान आणि आद्रता हे रोगाच्या वाढीवर परिणाम करणारे अतिमहत्वाचे घटक आहेत. ही बुरशी उच्च आद्रता (सुमारे ९०%) आणि १८ ते २६ डिग्री सेल्शियस तापामानात चांगलीच फोफावते. उबदार व कोरडे हवामान ह्या रोगाची वाढ थांबवितो.