बटाटा

बटाट्यावरील बांगडी रोग

Spongospora subterranea

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • गडद बीजाणु सामग्री असणारे फोड येऊन फुटतात आणि जाड, खडबडीत खाचा तयार करतात.
  • डाग आतल्या बाजुला वाढतात, ज्यामुळे खड्डे तयार होतात.
  • बटाट्याचे कंद विकृत आकाराची होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बटाटा

लक्षणे

झाडाच्या जमिनीवरील भागात या रोगाची लक्षणे दिसत नाहीत. सुरवातीची लक्षणे बटाट्याच्या कंदावर बारीक,गोलाकार, थोड्या उंचावलेल्या जांभळट तपकिरी फोडाच्या रुपात दिसतात जे हळुहळु आकाराने वाढत जाऊन एकमेकात मिसळतात आणि कालांतराने हे फोड बटाट्याच्या कंदाची साल फाडुन फुटतात आणि गडद तपकिरी भुकटीचे कँकर्स तयार होतात ज्यांना स्कॅब म्हटले जाते. सूज आणि गाठी किंवा मस्से विकसित झाल्यामुळे बटाटे विकृत आकाराचे होऊन बाजारात विकले जात नाहीत. जमिनीची आर्द्रता उच्च असल्यास डाग आतल्या बाजुला वाढतात, ज्यामुळे खोल खड्डे तयार होऊन आतील बराच भाग नाश पावतो. विसंगती साठवणीतही वाढतच जाते.

Recommendations

जैविक नियंत्रण

या जंतुविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार उपलब्ध नाहीत म्हणुन प्रतिबंधक उपाय करण्याची काळजी घ्या.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मेटाम सोडियम किंवा फल्युएझिनामने जमिन भिजविली असता काही वेळा चांगले काम होते पण ते सुद्धा बहुधा वातावरणाच्या परिस्थितीवर आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबुन असते.

कशामुळे झाले

पावडरी स्कॅब हे जमिनीतून उद्भवणाऱ्या जंतुंमुळे (स्पॉन्गोस्पोरा सबटेरेनिया) होतो आणि हे जंतु जमिनीत ६ वर्षांपर्यंत जगु शकतात. थंड हवामानात (१२-१८ डिग्री सेल्शियस) आणि जड, आम्लाच्या जमिनीत जिथे पाणी साठते तिथे हा रोग सामान्यपणे सापडतो. आलटून पालटून येणारे ओले आणि कोरडे वातावरण देखील या रोगाच्या वाढीसाठी अनुकूल असते. संक्रमित बियाणांचे कंद, कपडे, हत्यारे किंवा शेणखते या जंतुंचे वहन करतात. रोगाच्या संक्रमणाची सुरुवात कंद धारणेच्या काळात कंदातील नैसर्गिक छिद्रातुन, डोळ्यातुन किंवा जखमातुन होते. बटाट्याचे लालसर तपकिरी वाण नुकसानीची फारच कमी लक्षणे दर्शवितात. पावडरी स्कॅब हे सोलॅनिसियस कुटुंबातील बऱ्याच पिकांवर संक्रमण करते, उदा. टॉमॅटो.


प्रतिबंधक उपाय

  • बियाणे विक्रेत्याकडुन संवेदनक्षम वाण घ्या.
  • लागवडीसाठी निरोगी कंदांचा वापर करा.
  • एक चांगला समन्वयित पीक फेरपालट कार्यक्रम कार्यान्वित करा.
  • पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या व जिथे पाणी साचणार नाही अशा ठिकाणी बटाट्याची लागवड करा.
  • शेतात आणि आजुबाजुला सोलानेसियस कुटुंबातील इतर पर्यायी यजमानांसाठी निरीक्षण करा आणि असल्यास त्यांचे निर्मूलन करा.
  • जमिनीचा सामू नियंत्रित ठेवण्यासाठी गंधक वापरा.
  • आपली शेतीउपयोगी हत्यारे, कपडे आणि अवजारे निर्जंतुक करण्याची खास काळजी घ्या.
  • ज्या प्राण्यांना बुरशीयुक्त बटाटे खायला घातले आहेत त्या प्राण्यांपासुन तयार केलेले शेणखत वापरु नका.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरणी करून जमीन तापू द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा