Phytophthora infestans
बुरशी
सुरुवातीला पानांवर टोकापासुन किंवा कडेने गडद तपकिरी ठिपके येतात. दमट हवामानात हे ठिपके पाणी शोषल्यासारखे दिसतात. पानाच्या खालच्या बाजुला पांढरे बुरशीचे थर दिसते. जसजसा रोग वाढत जातो, तसतशी पूर्ण पाने पिवळी होऊन करपतात आणि वाळतात. असेच ठिपके खोडावर आणि देठावर देखील उमटतात. बटाट्याच्या कंदांवर राखाडीसर निळे ठिपके येतात आणि त्यांचा गरही तपकिरी होतो ज्यामुळे ते खाण्यायोग्य रहात नाहीत. प्रादुर्भावग्रस्त शेतात कुजण्यामुळे एक विशिष्ट वास सुटतो.
कोरड्या वातावरणापूर्वी कॉपरवर आधारीत बुरशीनाशके वापरावीत. सेंद्रीय औषधे जे पानांवर थर देतात त्यांच्या फवारण्या देखील संक्रमण रोखू शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. खास करुन दमट भागात उशीरा येणार्या करप्याचे नियंत्रण करण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर महत्वाचा आहे. स्पर्शजन्य बुरशीनाशके ज्यांचा पानांवर थर बसतो ती लागण होण्याआधी वापरल्यास जास्त परिणामकारक असतात आणि बुरशीत ह्याचा प्रतिकार निर्माण होत नाही. मँडिप्रोपामिड, क्लोरोथॅलोनिल, फ्ल्युझिनाम किंवा मँकोझेब असणार्या बुरशीनाशकांचा वापर प्रतिबंधक उपचार म्हणुन केला जाऊ शकतो. मँकोझेबसारख्या बुरशीनाशकासोबत बीज प्रक्रिया देखील कारगर सिद्ध होऊ शकते.
ही बुरशी बंधनकारी परजीवी आहे म्हणजे जिवंत रहाण्यासाठी हिने झाडांच्या अवशेषात आणि कंदांत तसेच पर्यायी यजमानातच सुप्तावस्थेत राहिले पाहिजे. झाडाला झालेल्या जखमेतुन आणि फाटलेल्या सालीतुन ही बुरशी आत प्रवेश करते. बुरशीचे बीजाणु वसंत ऋतुच्या उच्च तापमानात उगवतात आणि वारा किंवा पाण्याद्वारे पसरतात. थंड रात्रीच्या काळात (१८ डिग्री सेल्शियस पेक्षा कमी), उबदार दिवस (१८ ते २२ डिग्री सेल्शियस दरम्यान) आणि पाऊस आणि धुके (९०% सापेक्ष आर्द्रता) सारख्या विस्तारित ओल्या परिस्थितीमध्ये हा रोग अधिक गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये उशीरा येणार्या करप्याची साथ मोठ्या प्रमाणात येते.