कोबी

कोबीतील मुळकुजव्या

Plasmodiophora brassicae

बुरशी

थोडक्यात

  • एकुण, झाडे कुजतात, खुजी होतात आणि पाने पिवळी पडतात.
  • कोरड्या हवेत ती मरगळतात पण आर्द्र हवामानात ती सावरतात.
  • मुळांवर गाठी येतात ज्यामुळे मुळे एका ठिकाणी गोळा होतात.
  • वाढ आणि पीकाचे उत्पादन खूप कमी होते आणि जास्त प्रादुर्भाव झालेल्या झाडात मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
कोबी
फुलकोबी

कोबी

लक्षणे

लक्षणे जमिनीच्या वर आणि खालीही दिसतात. एकुण, रोपे नीट वाढत नाहीत, खुजी होतात आणि पाने पिवळी पडतात. कोरड्या हवेत ती मरगळतात पण आर्द्र हवेत परत सावरतात. पाने कदाचित जांभळी होतात. जमिनीखाली मुळांवर गाठी येतात आणि बारीक मुळे (मुळांवरचे केस) नष्ट होतात. कालांतराने मुळांवरील गाठींमुळे गंभीर विकृती येते, ज्यामुळे नेहमीच्या पसरलेल्या मुळांऐवजी ती एका ठिकाणी गोळा होतात. वाढ आणि पीकाचे उत्पादन खूप कमी होते आणि जास्त प्रादुर्भाव झालेल्या झाडात मर होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

थंडीच्या काळात ऑयस्टरचे शिंपले किंवा डोलोमाइट लाइमचा वापर करून जमिनीचा सामू वाढवून ७.२ पर्यंत करणे (छोटे बागाइतदार आणि शेतकरी) हे एकमेव सेंद्रिय नियंत्रण उपलब्ध आहे. सोपी आणि स्वस्त जमिनीची सामू चाचणी करण्याची किट्स उपलब्ध आहेत जी वापरुन बरेच वेळा तपासणी केली जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जमिनीच्या फ्युमिगेशनची शिफारस करण्यात येत नाही कारण त्याचा परिणाम १००% मिळत नाही. लागवडीच्या अगोदर जमिनीचा सामू वाढविण्यासाठी (७.२) चुनखडी (कॅल्शियम कार्बोनेट CaC03) आणि हायड्रेटेड चुना (कॅल्शियम हायड्रॉक्साइड Ca(OH)2) वापरून रोगाच्या घटना कमी करणे हा एक मार्ग आहे.

कशामुळे झाले

प्लाझ्मोडायोफोरा ब्रॅसिके नावाच्या जमिनीत रहाणार्‍याच जंतुंमुळे मुळांना केलेल्या संसर्गाने ही रोगाची लक्षणे उद्भवतात. ब्रसेल्स स्प्राउट्स, कोबी, फुलकोबी, सलगम आणि मुळा सारखी पीके या रोगामुळे प्रभावित होतात. बुरशीचे धोरण म्हणजे सुप्तावस्थेतील बिजाणुंचे उत्पादन करणे ज्यामुळे 20 वर्षांपर्यंत जमीन दूषित होऊ शकते. संवेदनशील झाडांच्या मुळाच्या उपस्थितीत, हे बीजाणू रुजतात आणि मुळांच्या केसांना संक्रमित करतात ज्यामुळे मुळांवर गाठी तयार होतात. ह्या गाठी आणखीन बीजाणू तयार करतात व जमिनीत सोडतात त्यामुळे त्यांचे एक जीवनचक्र पूर्ण होते. ओल्या आणि उबदार जमिनी ह्यांना अनुकूल आहेत. चुना वापरून जमिनीचा सामू वाढविल्यास मुळकुजव्या कमी होतो (पण नाहीसा होत नाही).


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • उपलब्ध असल्यास लवचिक वाणांची लागवड करा.
  • जास्त ओलावा टाळण्यासाठी गादी वाफ्यांवर लागवड करा.
  • शेतात पाण्याचा चांगला निचरा होईल याकडे लक्ष द्या व जास्त पाणी देणे टाळा.
  • दूषित साठ्यातुन पाणी देऊ नका.
  • पुढील काही वर्षांपर्यंत विविध पिकांसोबत फेरपालटची योजना करा.
  • ज्या भागात याआधी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तिथे लागवड करणे टाळा.
  • जमिनीचा कस राखा आणि सामू चांगला (७.२) ठेवा.
  • दूषित माती शेतीउपयोगी अवजार किंवा पायताणांना लागुन पसरणार नाही याची काळजी घ्या.
  • तण नियंत्रण चोखपणे करा.
  • संक्रमणाची पातळी कमी करण्यासाठी पीक घेतल्यानंतर जमिन नांगरुन तापू द्या.
  • शेतातुन संक्रमित झाडांचे अवशेष काढुन आणि नष्ट करुन संक्रमणाची शक्यता कमी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा