द्वीदल धान्य

फ्युसॅरियम मर

Fusarium oxysporum

बुरशी

थोडक्यात

  • रोपे मरगळतात.
  • पाने पिवळी पडतात.
  • फांदीच्या आतील भाग तपकिरी किंवा लाल रंगाचा असतो.

मध्ये देखील मिळू शकते

24 पिके
द्वीदल धान्य
कारले
कोबी
कॅनोला
अधिक

द्वीदल धान्य

लक्षणे

ही बुरशी पीकाप्रमाणे नुकसानाची संरचना दर्शविते. काही वेळा, झाडे कोवळी असताना देखील पाने पिवळी पडुन मरगळीची चिन्हे दाखवितात. प्रौढ झाडात, काही भागांवरच थोडी मरगळ सामान्यत: दिसते. दिवसातील सर्वांत जास्त गरम वेळेला हे सामान्य आहे. नंतर पाने बहुधा फक्त एकाच बाजुने पिवळी पडतात. फांद्याचे आडवे काप घेतले असता वाहक भागात तपकिरीसर-लाल रंगहीनता सुरुवातीला बुडावर व नंतर फांदीवर दिसते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बरेचसे जैविक नियंत्रण घटक, ज्यात जिवाणू आणि एफ. ऑक्झिस्पोरमचे नॉनपॅथोजेनिक स्ट्रेन्स ही येतात, जे या जंतुंबरोबर स्पर्धा करतात आणि फ्युसॅरियम मरच्या नियंत्रणासाठी काही पिकात वापरले जातात. ट्रिकोडर्मा व्हिरिडेचा वापरही बियाणांच्या उपचारांसाठी (१० ग्रॅ/किलो बियाणे) केला जातो. काही जमिनी फ्युसॅरियमची वाढ रोखतात. जमिनीचा सामू ६.५-७ राखा आणि अमोनियमचा नत्रच्या स्त्रोतासाठी वापर करण्याऐवजी नायट्रेटचा वापर केल्याने रोगाची गंभीरता कमी होईल.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर इतर कोणताही उपाय काम करत नसेल तर मातीजन्य बुरशीनाशके संक्रमित भागांवर लावा. जमिनीला कॉपर ऑक्झिक्लोराइड (३ ग्रॅम/ली) पाण्याने पेरणीपूर्वी/रोपणीपूर्वी भिजविल्यासही प्रभावी असते.

कशामुळे झाले

फ्युसॅरियम मर झाडाच्या वहन करणार्‍या भागांवर वाढते, ज्यामुळे पाणी आणि पोषण पुरवठा बरोबर होत नाही. रोपांना रोग थेट त्यांच्या मुळांतुन किंवा मुळांवर झालेल्या जखमांमुळे देखील होऊ शकतो. एकदा हा जंतु एका भागात स्थापन झाला तर तो खूप वर्षांपर्यंत सक्रिय असतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण निवडा.
  • जमिनीतील सामू ६.५-७ राखा आणि नायट्रेटला नत्रचा स्त्रोत म्हणुन वापरा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमितपणे निरीक्षण करून संक्रमित झाड काढून टाका.
  • दोन विविध शेतात काम करताना आपली शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारे स्वच्छ ठेवा.
  • शेतात काम करताना झाडांचे नुकसान टाळा.
  • शिफारशीत पोटॅशवर विशेष लक्ष देऊन संतुलित खते द्या.
  • काढणी नंतर झाडांचे पाळेमुळे खणुन जाळुन टाका.
  • बुरशीच्या नियंत्रणासाठी एका महिनाभर पूर्ण सूर्यप्रकाशात काळ्या प्लास्टिकच्या अच्छादनाने संक्रमित क्षेत्र झाकून द्या.
  • ५-७ वर्षांसाठी पीक फेरपालट केला असता जमिनीतील बुरशीची पातळी कमी होते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा