द्वीदल धान्य

शेंगवर्गीय पिकावरील तांबेरा

Uromyces appendiculatus

बुरशी

थोडक्यात

  • जुन्या पानांवर खालच्या बाजुला अतिसूक्ष्म तपकिरी ते पिवळे फोड येतात.
  • फोडांच्या भवताली पिवळसर भागांची प्रभावळ असु शकते.
  • ही लक्षणे देठ, फांद्या आणि शेंगांवर देखील येऊ शकतात.
  • पाने पिवळी पडून वाळतात आणि मरगळतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्वीदल धान्य

लक्षणे

जुन्या पानांच्या मुख्यत: खालच्या बाजुला अतिसूक्ष्म तपकिरी ते पिवळे फोड येऊन फुटतात. कालांतराने त्यांच्या आजुबाजुला पिवळ्या वाळलेल्या भागाची प्रभावळ तयार होते आणि गडद होते. त्याच प्रकारचे लांबट फोड देठ, फांद्या आणि शेंगांवर देखील येऊ शकतात. पाने पिवळी पडून वाळतात आणि अकाली गळतात. याच्या परिणामी पानगळ होऊ शकते ज्यामुळे उत्पादन प्रभावित होते. घेवड्यावरील तांबेरामुळे कोवळ्या रोपांची मर होऊ शकते. जुन्या झाडांवर या बुरशीमुळे उत्पादनावर फारसा प्रभाव पडत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलिस, आर्थ्रोबॅक्टर आणि स्ट्रेप्टोमाइसेस प्रजातींवर आधारीत जैव कीटकनाशके देखील रोगाची वाढ परिणामकारकपणे प्रभावित करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ट्रायझोल आणि स्ट्रोबिल्युरिन बुरशीनाशकांनी तांबेर्‍याच्या नियंत्रणात चांगले परिणाम दर्शविले आहेत.

कशामुळे झाले

युरोमायसेस अॅपेंडिक्युलॅटस नावाची ही बुरशी जमिनीतील झाडांच्या अवशेषात आपली सुप्तावस्था घालवते. ही बंधनकारक परजीवी आहे म्हणजे हिला जगण्यासाठी झाडाच्या अवशेषांची गरज असते. सुरवातीचे संक्रमण, वारा, पाणी आणि इतर किडींद्वारे बीजाणू पसरल्याने होते. उच्च आर्द्रता आणि वाढीव तापमानात बुरशी झपाट्याने फोफावते. अशा हवामानत बीजाणू फार झपाट्याने पसरु शकतात. ऊबदार, ओल्या वातावरणाच्या लांबलेल्या काळात हा रोग चांगलेच गंभीर रुप धारण करु शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • संक्रमित भागात घेवड्याची लागवड करु नका.
  • मक्यासारख्या यजमान नसणार्‍या पिकांसोबत आंतरपीक घ्या.
  • शेतातुन तण आणि स्वयंभू रोपे नष्ट करा.
  • जास्त सिंचन देऊ नका आणि तुषार सिंचन टाळा.
  • सर्व संक्रमित भाग छाटुन काढा.
  • काढणीनंतर झाडांचे सर्व अवशेष काढुन शेत स्वच्छ करा.
  • पेरणीची तारीख आणि सिंचनाची वेळ काळजीपूर्वक निवडुन ठरवा म्हणजे तापमान उच्च असताना पाने जास्त काळ ओली रहाणार नाहीत.
  • नत्राचा अतिरेकी वापर टाळा आणि पुरेसे पलाशयुक्त खत द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा