Colletotrichum lindemuthianum
बुरशी
संक्रमित बियाणांपासुन उगवलेल्या रोपांच्या पान आणि फांद्यांवर गोल, गडद तपकिरी ते काळे खोलगट डाग असतात. रोपांची वाढ बाधीत होते आणि ती अकाली मरु शकतात किंवा वाढ खुंटु शकते. दुय्यम संक्रमणात पानांच्या शिरा आणि देठांवर कोनेदार लालभडक ते काळे डाग पहिल्यांदा खालच्या बाजुला नंतर वरच्या बाजुलाही येतात. शेंग आणि फांद्यांवर गोल, काळ्या किनारीचे फिकट तपकिरी ते तांबट डाग येतात. गंभीररीत्या संक्रमित झालेल्या शेंगांवर हे डाग आक्रसतात आणि थोडे विकृत होतात ज्यामुळे खोलगट देवीच्या व्रणासारखे (कँकर्स) दिसतात. संक्रमित बियाणे बहुधा रंगहीन असतात आणि काळे ते तपकिरी देवीच्या व्रणासारखे (कँकर्स) विकसित होऊ शकतात. कॉमन बीन्सचे झाड या रोगास खूप संवेदनशील असतात.
नीम तेलाचा अर्क दर ७-१० दिवसांनी वाढीच्या काळातील सर्वात जास्त उष्ण काळात केल्यास बुरशीची वाढ सीमित केली जाऊ शकते. जैविक घटक देखील संक्रमणाचे नियंत्रण करण्यात मदत करु शकतात. उदा. ट्रायकोडर्मा हरझियानम बुरशी आणि सुडोमोनस फ्ल्युरोसेनस जिवाणू सारखे जैविक नियंत्रक घटकांचे उपचार जर बीज प्रक्रियेत केले गेले तर कोलेटोट्रिकम लिन्डेम्युथियानमची वाढ सीमित होते. बुरशीला मारण्यासाठी बियाणांना गरम पाण्यात (५० अंश) दहा मिनीटांसाठी बुडवुन ठेवा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बुरशीनाशकांचा फवारणी केल्यास शेतातील रोगांची तीव्रता कमी होऊ शकते पण ते फार खार्चिक असते. मँकोझेब, क्लोरोथॅलोनिल, फ्ल्युट्रियाफोल, पेनकोनाझोल किंवा कॉपरवर आधारीत बुरशीनाशक उत्पादांचा पाने कोरडी असताना वापर केला जाऊ शकतो.
कोलेटोट्रिकम लिन्डेम्युथियानम नावाच्या बुरशीमुळे काळा करपा होतो. ही बहुधा बियाणेजन्य आहे पण पिकाच्या अवशेषात आणि पर्यायी यजमानातही जगते. जेव्हा हवामान अनुकूल असते तेव्हा ती बीजाणू सोडते जिचा प्रसार वारा किंवा पावसाने होतो. थंड ते मध्यम तापमान (१३-२१ अंश), उच्च आर्द्रतेचे काळ, दव, ओली पाने किंवा वारंवार पाऊस बुरशीच्या जीवनचक्राला आणि रोगाच्या वाढीला अनुकूल आहे. बुरशी पाण्याबरोबर पसरत असल्या कारणाने जर पाने ओली असताना शेतात काम करताना इजा झाल्या तरी हिचा प्रसार होऊ शकतो. बुरशी शेंगात शिरुन आतील खोलगट भागाला किंवा बियाणांच्या टरफलाला संक्रमित करु शकते.