इतर

स्ट्रॉबेरीवरील र्‍हिझोम कूज

Phytophthora cactorum

बुरशी

थोडक्यात

  • पाने मध्यापासुन तपकिरी पडतात.
  • सडण्याचे डाग मुळांजवळ दिसतात.
  • मोठ्या बागायतीत फक्त एकाच रोपाला लागण होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
स्ट्रॉबेरी

इतर

लक्षणे

शेंडे मरीचा संसर्ग झाल्यास एकेकटे पान तपकिरी होण्यास सुरवात होते. मधल्या पानांपासुन सुरवात होते, रोपाच्या वरचा भाग मरगळतो आणि अखेरीस मरतो. मुळांमध्ये पाहिले असता स्पष्टपणे मर्यादित, लाल तपकिरी, सडलेले डाग दिसतात. तेच रोपाला पाणी मिळण्यात अडथळा आणतात. शेंडे मरीची लक्षणे वसंतात दिसतात आणि फुलोर्‍यानंतर लगेचच दिसतात. संसर्गित रोपांच्या आजुबाजुला निरोगी रोपेही वाढतात, हे ह्या रोगाचे वैशिष्ट्य आहे. उबदार वसंताच्या हवेत, पहिले नुकसान ४-६ आठवड्यात दिसते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

थेट उपचार शक्य नाहीत. प्रतिबंधक उपाययोजना करुन संसर्ग टाळा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. परत संसर्ग होऊ नये म्हणुन मेफेनोक्झाम आणि मेटॅलॅक्सिल ला ठिबक सिंचनाद्वारे प्रभावित भागात द्या.

कशामुळे झाले

शेंडे मर बुरशी जंतु (फिटोफ्थोरा कॅक्टोरम) जमिनीत वर्षानुवर्ष राहू शकतो. ह्या बुरशीची बीजांडे पसरण्यासाठी पाण्यावर अवलंबुन असतात आणि उडणार्‍या पाण्यातुन ह्यांचा प्रसार होतो. पाणी जमा होणे हा मुळे सडविणार्‍या बुरशी संसर्गाचा सामान्य स्त्रोत आहे.


प्रतिबंधक उपाय

  • पाण्याचा चांगला निचरा होईल अशा ठिकाणी रोपे लावावीत.
  • फळांचा किंवा पानांचा जमिनीला स्पर्श होऊ देऊ नका.
  • लाकडाच्या ढलप्या किंवा सुकलेले गवत आच्छादनासाठी वापरा.
  • संसर्गित भागात रोपणी करु नका.
  • लवचिक प्रकारची रोपे वापरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा