स्ट्रॉबेरी

पानांवरील सामान्य करपा

Mycosphaerella fragariae

बुरशी

थोडक्यात

  • बहुधा पहिल्यांदा जुन्या पानांवर जांभळे डाग येतात.
  • जसे ते जुने होत जातात त्यांची केंद्रे सफेद किंवा राखाडी होतात.
  • पाने क्लोरोटिक होऊन सुकुन मरतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी

लक्षणे

स्ट्रॉबेरीचा कोणता प्रकार लावला आहे आणि वातावरण कसे आहे ह्यावर लक्षणे अवलंबुन आहेत. बहुधा जुन्या पानांवर जांभळे डाग (३-६ मि.मी. व्यासाचे) वरच्या पृष्ठभागावर उमटतात, काही वेळा त्यांना थोडी गडद किनारही असते. काही बाबतीत, जसे डाग जुने होतात, ते पांढरे ते राखाडी होऊन तपकिरी किनार येते. उष्ण आद्र हवामानत कोवळ्या पानांवर सगळीकडुन तपकिरी असणारे किनारीशिवाय किंवा फिकट केंद्रांचे विशिष्ट डाग उमटतात. नंतर पूर्ण पानच भरपूर डागांनी भरते आणि क्लोरोटिक होते, सुकते आणि मरते. नविन, कोवळी पाने ह्या जंतुला जास्त संवेदनशील असतात. लांबट डाग कोंबांवर आणि कोंबाच्या मुळाशी तयार होऊ शकतात ज्यामुळे पाण्याचे वहन नीट होत नाही आणि रोपे दुय्यम जंतुंच्या संसर्गास जास्त संवेदनशील होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

रोगाच्या नियंत्रणासाठी प्रयोगशाळेतील चाचणीत बॅसिलस सेरियस जंतु आणि यीस्ट सॅकारोमायीस बौलारडी असणारी द्रावणे बुरशीनशकांइतकीच परिणामकारक सिद्ध झाली आहेत. तरीपण ह्या उत्पादांची चाचणी अजुन मोठ्या शेतात केली गेली नाही.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या रोगाचे नियंत्रण करणे कठिण असते कारण रोग लागल्यानंतरच लक्षणे दिसतात. क्लोरोथॅलोनिल, मायक्लोब्युटानिल किंवा ट्रिफ्ल्युमिझोलवर आधारीत बुरशीनाशकांचा वापर स्ट्रॉबेरीच्या पानांवरील सामान्य करप्याचे पहिले लक्षण दिसताच केला जाऊ शकतो. उपचार वसंताच्या सुरवातीला किंवा रेनोव्हेशन नंतर लगेच केला गेला पाहिजे आणि दर दोन अठवड्याला फवारणी करण्याची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

मायकोस्फेरेला फ्रागारि नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात जी बाधीत रोपाच्या जमिनीवर गळलेल्या पाल्यापाचोळ्यात सुप्तावस्थेत रहाते. वसंतात त्यांची वाढ पुन्हा सुरु होते आणि बीजांडे निर्माण करतात जी जवळपासच्या रोपांच्या खालच्या पानांवर पसरतात. जी बीजांडे पानांवर पडतात ती जंतुंचे नळकांडे तयार करतात जे पानांच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागाच्या नैसर्गिक छिद्रातुन आत शिरकाव करते. जसे ते वाढते, बुरशी नविन बीजांडांचे गुच्च तयार करते जे नविन पानांवर पावसाच्या उडणार्‍या पाण्याने आणि वार्‍याने पसरते. मानवी किंवा यंत्रांचा शेतातील वावरही संसर्गाचा स्त्रोत असु शकतात. दिवसाचे थंड हवामान (सुमारे २५ डिग्री सेल्शियस) आणि रात्रीचे थंड हवामान, उच्च सापेक्ष आद्रता आणि पाने जास्त काळ ओली रहाणे हे रोगाच्या वाढीसाठी अनुकूल आहे. शेतीच्या वाईट सवयी जसे कि रोपे फार जवळ जवळ लावणे ह्यानेही लागणीची जोखिम वाढु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • पेरणीसाठी बियाणे प्रमाणित स्त्रोतांकडुनच घेण्याची काळजी घ्या.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास लवचिक वाण लावा.
  • हलक्या, पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनीत जिथे हवा चांगली खेळती रहाते आणि ऊन भरपूर येते तिथे पेरणे करा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण काढुन टाका.
  • उच्च आद्रता टाळण्यासाठी संध्याकाळी पाणी देऊ नका.
  • संतुलित पोषके द्या पण जास्त नत्र देऊ नका.
  • बाधीत रोपे आणि पीकांचे अवशेष काढुन जाळा किंवा शेतापासुन दूर पुरा.
  • जेव्हा पाने ओली असतील तेव्हा शेतात काम करु नका आणि रोपांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा