स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीवरील भुरी

Podosphaera aphanis

बुरशी

थोडक्यात

  • पाने वरच्या दिशेने गोळा होतात व त्यांच्या खालच्या बाजूला पांढऱ्या बुरशीचे थर येतात.
  • लालसर ते तपकिरी चट्टे पानाच्या दोन्ही बाजुला दिसतात.
  • फळ निस्तेज, चिरा गेलेली आणि लालसर गुलाबी दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी

लक्षणे

पाने कडांकडुन वरच्या दिशेने गोळा होतात आणि खालच्या पृष्ठभागावर बुरशीचे आच्छादन असलेले पांढरे धब्बे दिसु लागतात. धब्बे अखेरीस एकमेकांत मिसळतात आणि पानाच्या खालच्या पूर्ण बाजुस आच्छादतात. जांभळे आणि लालसर चट्टे पानांच्या दोन्ही बाजूस आढळतात, तसेच असंख्य काळ्या रंगाचे ठिपके देखील येतात. संक्रमित फुले विकृत फळे निर्माण करतात किंवा फळेच देत नाहीत. प्रभावित फळे निस्तेज दिसतात आणि गंभीर बाबतीत ती वाळतात, तडकतात आणि गव्हाळ ते लालसर गुलाबी दिसतात. पानांवर केस असल्याने काही वेळा बुरशीला ओळखणे कठिण जाते. या कारणासाठी भिंग वापरण्याची शिफारस करण्यात येते. भुरीची जास्त लागण झाली असता प्रकाश संस्लेषण खूप कमी होते, ज्यामुळे संपूर्ण झाडाचा जोम, फळांचे उत्पादन आणि प्रत देखील कमी होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

कमी संक्रमण असल्यास पाणी आणि दुधाचे द्रावण जे नैसर्गिक बुरशीनाशक आहे त्याची फवारणी करून धुतले जाऊ शकते. या द्रावणाची एक दिवसाआड फवारणी करत राहावी. सिलिकॉन असणारे उत्पादांची फवारणी केल्यास देखील बुरशीची लागण कमी होते. प्रमाणित जैविक गंधकाचे द्रावणही प्रतिबंधक म्हणुन वापरले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्विनॉक्झिफेन, ट्रिफ्ल्युमिझोल, मायक्लोब्युटानिल, सल्फरचे कण किंवा अॅझोक्सिस्ट्रोबिन असणार्‍या बुरशीनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. तथापि, भुरीत बुरशीनाशकांचा प्रतिकार निर्माण होण्याची समस्या रहातेच. गंधकाचा उपयोग प्रतिबंधक म्हणुन केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

पोडोस्फेरा अॅफॅनिस नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात. ही बंधनकारक बुरशी आहे व तिची सुप्तावस्था घालविण्यासाठी संक्रमित स्ट्रॉबेरीच्या पान किंवा इतर पर्यायी यजमानांची गरज असते. संक्रमित रोपांद्वारे देखील शेतात या रोगाचा प्रसार होऊ शकते. अनुकूल परिस्थितीत, बुरशी पुन्हा वाढते आणि बीजाणू बनविण्यास सुरुवात करते जी वार्‍याने निरोगी झाडांवर पसरतात. वादळ, मध्यम ते उच्च आद्रता, पानांचा कोरडा पृष्ठभाग आणि १५-२७ अंश सेल्शियस तापमान यांच्या जीवनचक्रास मानवते. बुरशी जंतुंमध्ये एक लक्षणीय अपवाद म्हणून संक्रमण आणि उगवण्यासाठी हिला पाण्याची गरज लागत नाही. स्ट्रॉबेरीच्या शेतात गरमट तापमानाबरोबर उच्च आद्रता फळांवरील भुरीच्या वाढीस अनुकूल असते. तुषार सिंचन, पाऊस आणि दव या रोगाच्या प्रसारात आणि वाढीत अडथळा आणतो. म्हणुन हा जंतु हरितगृहात आणि उंच टनेलमध्ये जास्त समस्या निर्माण करतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास संवेदनक्षम वाण लावा.
  • मुबलक सुर्यप्रकाश, चांगली खेळती हवा आणि कमी सावली असलेले ठिकाण लागवडीसाठी निवडावे.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • स्ट्रॉबेरीच्या रोपांचे या बुरशीच्या लक्षणांसाठी नियमित निरीक्षण करा.
  • संतुलित खत नियोजन करा व नत्रयुक्त खतांचा वापर टाळा.
  • तापमान बदलांची तीव्रता टाळा.
  • काढणी केल्या नंतर झाडी छाटा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा