टोमॅटो

ब्हर्टिसिलियम मर

Verticillium spp.

बुरशी

थोडक्यात

  • कडांपासुन सुरु होऊन पाने पिवळी पडतात.
  • पानांच्या मुख्य शीरा हिरव्याच रहातात.
  • फांद्यांवर काळे पट्टे येतात.
  • रोप मरगळते.

मध्ये देखील मिळू शकते

26 पिके
जर्दाळू
द्वीदल धान्य
कारले
कोबी
अधिक

टोमॅटो

लक्षणे

विविध पीकांत वेगवेगळी लक्षणे दिसतात. सामान्यत: जुन्या पानांच्या कडांवर सुरुवातीला शिरांमधील पिवळेपणा येतो. जसा तो पिवळेपणा पानाच्या इतर भागात पोचतो, पान शक्यतो फक्त एकाच बाजुने मरगळल्यासारखे दिसते. या विशिष्ट गुणास विभागीय पिवळेपणा किंवा "एकबाजुची मरगळ" असे म्हटले जाते. उबदार उन्हाळी वातावरणात ही लक्षणे बळावतात. खोडावर एक काळी पट्टी बुडापासुन वरपर्यंत मरगळणार्याा फांद्यापर्यंत जाताना दिसते. झाडांची वाढ चांगली न होणे, खुंटणे, पाने लवकर पिकणे आणि पूर्ण फांद्या वाळणे ही काही लक्षणे असु शकतात. गोलाकार वर्तुळाच्या रुपात किंवा पट्ट्याच्या रुपात लाकडावर डाग दिसणे ही काही अतिरिक्त लक्षणे आहेत. काही वेळा, जवळुन भिंगातुन पाहिले असता, मर झालेल्या पेशींमध्ये किंवा जिवंत पेशीमध्ये लहान काळे ठिपके देखील दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

स्ट्रेप्टोमायसेस लिडिकस असणारे जैव बुरशीनाशक ह्या बुरशीचा जीवनक्रम तोडतात आणि रोगाची वाढ थांबविण्यात मदत करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर झाड रोगाने संक्रमित झाले तर त्याच्यापासुन मुक्ती मिळविणे फार कठिण असते. जमिनीत धुमन करणे परिणामकारक असते पण खार्चिक देखील असते. परिणाम हा वापरल्या गेलेल्या रसायन, प्रमाण आणि हवामानावर आणि कोणत्या वेळी वापरले गेले यावर अवलंबुन असते. प्रभावित भागांच्याच उपचारांचा विचार केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

जमिनीत रहाणार्या पुष्कळ प्रकारच्या बुरशीमुळे जसे कि व्ही. डाहिले, ब्हर्टिसिलियम विल्ट होते आणि जेव्हा पर्यायी यजमान उपलब्ध नसतो तेव्हा ती झाडांच्या अवशेषात जमिनीत जिवंत राहते. ती झाडाच्या वाहक भागांमध्ये मुळांद्वारे किंवा खोडाला झालेल्या जखमांतुन शिरते. एकदा का ती रोपात किंवा झाडाच्या आत शिरली, कि तिची झपाट्याने वाढ होते आणि ती पाणी आणि पोषण अडवते, ज्यामुळे रोपाच्या वरच्या भागाची (पान आणि फांद्या) मरगळ आणि कुज सुरु होते. उबदार जास्त ऊन असलेल्या हवामानामुळे ह्याची तीव्रता वाढते. रोगाच्या नंतरच्या टप्प्यात बुरशी वाळणार्याा पेशींमध्ये वस्ती करते आणि गडद रंगाची रचना करते जे भिंगातुन पाहता येते. बुरशी बऱ्याच वर्षांपर्यंत एका जागी जिवंत राहु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक किंवा सहनशील असलेल्या वाणांचा वापर करणे हे सर्वोत्तम उपाय आहे.
  • रोग पसरवू शकणाऱ्या संवेदनशील अंतरपिकांचा वापर करू नका.
  • भरपूर नत्र असलेली खते आणि जास्त पाणी देणे टाळा.
  • पोषकांचा वापर करून झाडे सुदृढ करा.
  • झाडांचे संक्रमित भाग छाटुन जाळा.
  • सर्व शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारे संक्रमित झाडांवर वापरल्यानंतर स्वच्छ करा.
  • पाने ओली असताना शेतात काम करणे टाळा.
  • शेतात काम करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • जमिनीला काही काळ सुर्यप्रकाशाने चांगले तापु द्या.
  • झाडांचे अवशेष काढुन जमिनीत खोल पुरा किंवा जाळुन टाका.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा