इतर

वल्सा रोग

Valsa leucostoma

बुरशी

थोडक्यात

  • विविध रंगाचे कँकर्स सालीच्या भागात विकसित होतात.
  • पीच, चेरी आणि प्लमवर ह्या कँकर्समधुन चिकट स्त्राव गळतो.
  • बुरशीचे बीजाणू असणारे मश्श्यासारखे भाग मृत भागात तयार होतात आणि ते बेडकाच्या कातडीसारखे दिसतात.
  • फांद्यांना वेढले गेल्याने पाने मरगळतात आणि काटक्यांची मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
जर्दाळू
चेरी
पीच

इतर

लक्षणे

संक्रमित केलेल्या यजमानाप्रमाणे लक्षणे थोडी बदलतात. कँकर्स बहुधा विखुरलेले असतात, खोलगट नसतात आणि झटकन लक्षात येत नाहीत जोपर्यंत त्यांनी पूर्ण फांदीला वेढलेले नाही ज्यामुळे पाने मरगळतात आणि अखेरीस काटक्या मरतात. प्रभावित यजमान वाणाप्रमाणे होणारी रंगहीनता पिवळा ते लाल-तपकिरी, ते राखाडी किंवा काळी असते. सालीचे संक्रमित भाग खचतात आणि त्यावर काळ्या मश्शासारखी बुरशीचे बीजाणू असलेली वाढ दिसुन येते ज्यामुळे झाडाचा तो भाग वेिशेषपणे बेडकाच्या कातडीसारखा दिसतो. पीच, चेरी आणि प्लमवर ह्या कँकर्समधुन चिकट स्त्राव झिरपतो. खोड, फांद्या आणि काटक्यांवर कँकर्सची संख्या वाढल्यास रोपाचा जोर कमी होतो, फांद्यांची मर होते आणि झाडही मरु शकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

एकदा का संक्रमण झाले कि चांगली खत योजना आणि फॉर्टिफायर्स वापरुन बागेचा जोम वाढविणे हाच उत्कृष्ट उपाय आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या रोगाचे उत्तम व्यवस्थापन म्हणजे प्रतिबंधक उपायांच्या शृंखलेद्वारे ह्याची सुरवातच टाळणे. छाटणीच्या जखमांना बुरशीनाशक मलमपट्टी करावी.

कशामुळे झाले

व्हॅल्सा आणि ल्युकोस्टोमा नावाच्या प्रजातीच्या पुष्कळ प्रकारच्या जंतुमुळे लक्षणे उद्भवतात. एकत्रितपणे त्यांना सिटोस्पोरा कँकर्सं म्हणुन संदर्भित केले जाते. वनस्पती वाढीच्या सुरवातीला, खोडावरील आणि फांद्यांवरील मश्श्यासारख्या बुरशी जनन रचनेतुन बीजाणू तयार होऊन, पावसाने निरोगी भागांवर प्रसारीत होतात. बुरशीच्या धाग्यासारख्या रचनेच्या मदतीने ते सालीच्या भागात शिरतात. जंतु केवळ जखमांतील परजीवी आहेत आणि संक्रमणासाठी ह्यांना मृत भागाची गरज असते. पानांवरील चर्‍यातुन, गारपीठ किंवा गोठलेल्या दवाच्या नुकसानातुन तसेच शेतकाम करताना किंवा छाटणी करताना झालेल्या जखमेतुन ते लाकडात शिरतात. ज्या झाडांना पर्यावरणाचा ताण येऊन उदा. टोकाचे तापमान किंवा आर्द्रता, कमजोर झाली आहेत त्यावर ही संधीसाधु बुरशी संक्रमण करते. हे जंतु सफरचंद आणि काही स्टोन फळांवर तसेच इतर पुष्कळशा झाडांवर जसे कि अॅस्पेन, पॉप्लर, एल्म, विलो, बर्च, मेपर, सिकॅमोर, ओकवर संक्रमण करतात.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिकारक वाण लावा.
  • लागवडीची जागा तयार करताना जास्त स्वच्छतेचे मानक राखा.
  • नविन बागा तयार करताना काळजीपूर्वक जागा निवडा.
  • बागेला नियमित पाणी द्या आणि दुष्काळ किंवा पाणी साचणे टाळा.
  • झाडांना त्यांच्या गरजेप्रमाणे खते द्या.
  • संक्रमणाच्या मुख्य काळात छाटणी करु नका.
  • छाटणी करताना झालेल्या मोठ्या जखमांना बुरशीनाशकाची मलमपट्टी करा.
  • दुष्काळ, जमिनीवर पाणी भरणे यासारखे ताण आणि इतर जंतुंचे संक्रमण टाळा.
  • शेतातुन संक्रमित फांद्या काढुन टाका.
  • छाटणी करताना अधीमधी शक्य असल्यास छाटणीची उपकरणे निर्जंतुक करुन घ्या.
  • यजमान नसणार्‍या रोपांचे वार्‍याला अडथळे निर्माण करा.
  • किडे आणि उंदरांचे नियंत्रण करा ज्यामुळे झाडाला गंभीर नुकसान होऊ शकते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा