Tranzschelia pruni spinosae
बुरशी
हा रोग आलुबुखार्याच्या झाडास आणि क्वचित इतर कडक बियांच्या झाडांसही प्रभावित करतो. वसंत ऋतुत उशीरा पानांवर लक्षणे दिसतात आणि झाडांच्या प्रजातींप्रमाणे ती थोडी वेगळी असु शकतात. सुरवातीला, छोट्या कोणेदार, चकचकीत पिवळ्या ठिपक्यांचा मोझाईक सौरचना पानांच्या वरच्या बाजुला दिसतो. जसजसा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तसतसे त्या ठिपक्यांच्या खाली पानाच्या खालच्या बाजुला तपकिरीसर लाल ते फिकट तपकिरी फोड येतात. मोसमात नंतर, ते गडद तपकिरी किंवा काळे पडतात. गंभी्ररीत्या प्रादुर्भावित पाने कोरडी होऊन तपकिरी होतात आणि झपाट्याने गळतात. ह्या अकाली पानगळतीमुळे फुल विकसनावर आणि पुढच्या मोसमातील फळांच्या प्रतीवरही वाईट परिणाम होतो. शिवाय, जर ह्याच झाडावर दर वर्षी प्रादुर्भाव झाल्यास, झाडाचा जोमच जातो. फळांवरही डाग येऊन ती विक्रीलायक उरत नाहीत.
ह्यामुळे फळांवर थेट परिणाम होत नसल्याने, बहुतेक बाबतीत, उपचारांची गरज भासत नाही कारण ही बुरशी अनियमितपणे येते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संक्रमणाची पहिली चिन्हे दिसताक्षणीच बुरशीनाशक फवारणी सुरु करायला हवी. मयक्लोब्युटानिल, पयराक्लोस्ट्रोबिन, बोस्कालिड, मँकोझेब, ट्रयफ्लोक्झिस्ट्रोबिन किंवा डायफेनोकोनाझोल सारख्या घटकांवर आधारीत उत्पादनांचा वापर केल्यास रोगाचे नियंत्रण करण्यात मदत मिळते. उशीरा झालेल्या संक्रमणाच्या बाबतीत, शक्य झाल्यास, उपचार हे थेट तोडणीनंतर करायला हवेत.
ट्रान्झचेलिया प्रुनि-स्पिनोसे नावाच्या बुरशी जी परावलंबी परजीवी आहे म्हणजेच तिला जगण्यासाठी आणि जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी त्यांना जिवंत यजमानाची आवश्यकता असते. फांद्यांच्या सालीच्या बेचक्यात किंवा कळ्यांच्या कोषात घातलेल्या विश्रांती घेत असलेल्या बीजाणुंच्या रुपात बुरशी असते. किंवा उन्हाळ्यात उशीरा जेव्हा आलुबुखार्याची झाडे सुप्तावस्थेत जातात तेव्हा ही यजमान बदलुन अॅनेमोन प्रजातीवर जगते. पानांच्या खालील बाजुच्या डागात, बीजाणू निर्मितीची रचना असते ज्यातुन दोन प्रकारचे बीजाणू उत्पादीत होतात: एक जे टणक बियांच्या फळझाडांना वसंत ऋतुत आणि उन्हाळ्यात उशीरा संक्रमित करतात किंवा असे जे मोसमात उशीरा फक्त पर्यायी यजमानांनाच संक्रमित करतात. दोन्ही बाबतीत, पानांवरील आर्द्रता (दव वा पाऊस) मिळाल्यास बीजाणू झपाट्याने अंकुरतात. कमी उंचीवरील आर्द्र ठिकाणे आणि संवेदनशील वाणे ह्यामुळे बुरशीच्या घटनांना जोम मिळतो. जगातील बहुतेक भागात जेव्हा-जेव्हा हा रोग पाहिला गेला आहे, ह्याचा प्रसार फार झपाट्याने झाला आहे आणि जर हवामान ह्याच्या वाढीस अनुकूल असेल तर मग ह्याचा उद्रेकच होतो.