इतर

चेरीच्या पानावरील ठिपके

Blumeriella jaapii

बुरशी

थोडक्यात

  • अंधुकसे जांभळे ठिपके जुन्या पानांच्या वरच्या बाजुला येतात.
  • खालच्या बाजुला तपकिरी ठिपके येतात जे नंतर वाढुन पिवळ्या किंवा पांढर्‍या उशा बनतात.
  • पाने पिवळी पडतात आणि झाडाची अकाली पानगळ होते.
  • जर रोग गंभीर झाला तर फळांच्या पक्व होण्यावर आणि प्रतीवरही प्रभाव पडतो.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
बदाम
जर्दाळू
चेरी

इतर

लक्षणे

कोणत्या प्रकारचे वाण प्रभावित झाले आहे ह्याप्रमाणे लक्षणे थोडी बदलु शकतात. उन्हाळ्यात लवकर, जुन्या पानांच्या वरच्या बाजुला अंधुकसे जांभळे ते तपकिरीसर गोल ठिपके उमटतात. हे ठिपके विशेष करुन १-३ मि.मी. व्यासाचे असतात आणि कालांतराने लालसर तपकिरी होतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर, ठिपके बहुतेक वेळा एकमेकात मिसळतात आणि पानाचा मोठा भाग व्यापतात. काही यजमानात पानाचा सुकलेला भाग गळतो ज्यामुळे बंदुकीची गोळी मारल्यासारखे दिसते. पानांच्या खालच्या बाजुला छोटे लाल ते पांढरे ठिपके येतात, जे मुख्यत: पानांच्या शिरांना चिकटलेले असतात. कालांतराने ते पिवळसर किंवा पांढर्‍या बीजाणूंच्या उशीत बदलतात जे नुसत्या डोळ्यांनाही दिसतात. पाने पूर्णपणे पिवळी पडतात आणि अकाली गळतात. गंभीर संक्रमण झाल्यास मध्य उन्हाळ्यापर्यंत पूर्ण पानगळ होऊ शकते, ज्याचे परिणाम फळांच्या वाढीवर होतात जी मऊ आणि अपक्व रहातात किंवा असमानपणे पक्व होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ह्या रोगाविरुद्ध कोणतेही जैव नियंत्रण उपलब्ध नाहीसे वाटते. जर आपल्याला काही माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. सेंद्रिय बुरशीनाशकात कॉपर सॉल्टस असणारी द्रावणे येतात जसे कि कॉपर हायड्रोक्साइड किंवा कॉपर सल्फेट, जी काही प्रमाणात पानांवरील ठिपक्यांपासुन संरक्षण देतात. बुरशीनाशकांचा उत्कृष्ट परिणाम तेव्हा दिसतो जेव्हा शेतातील स्वच्छतेबरोबर त्यांची सांगड घातली जाते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगाचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधक उपाय गरजेचे आहेत पण शेवटी जास्त उत्पन्न आणि प्रत राखण्यासाठी बुरशीनाशकांची जरुर पडतेच. फुलधारणा झाल्यानंतर २ अठवड्यांनी रोगाच्या प्रभावाप्रमाणे ५ ते ७ वापरांची शिफारस केली जाते. क्लोरोथॅलोनिल, कप्तान, स्ट्रोबिल्युरिन्स ही समान सक्रिय घटक असलेली बुरशीनाशके सामान्यपणे वापरली जातात आणि इतर बुरशीनाशके जसे कि फेनब्युकोनाझोल, टेब्युकोनाझोल, मायक्लोब्युटानिल. सक्रिय घटकांना बदलल्यास प्रतिकारक बुरशीविरुद्ध उत्तम संरक्षण मिळते.

कशामुळे झाले

बोल्युमेरिएला जापि नावाच्या बुरशीमुळे चेरीच्या पानावरील ठिपके उद्भवतात, जी चेरीव्यतिरिक्त, प्लम, आणि अॅप्रिकॉटच्या झाडांनाही संक्रमित करते. बागेच्या जमिनीवरील गळलेल्या पानात बुरशी विश्रांती घेते. वसंत ऋतुत जेव्हा तापमान ६ अंशाच्या वर जाते तेव्हा बुरशी अंकुरते आणि बीजाणू तयार करते जे वार्‍याबरोबर किंवा पावसाबरोबर पसरतात. वाढीच्या पूर्ण काळात पाने संवेदनशील असतात. एकाच हंगामात पर्यावरणाच्या परिस्थितीप्रमाणे, खास करुन पाने ओली रहाण्याने संक्रमण चक्र पुष्कळ वेळा परत परत होत रहाते. उदा. १० अंशाखालील आणि ३० अंशावरील तापमानात, बुरशीला यशस्वीपणे संक्रमण करण्यासाठी, पाने किमान २८ तास तरी ओली रहाण्याची गरज आहे. हीच वेळ २० अंश तापमानात फक्त ५ तास आहे. ह्यावरुन कळते कि ज्या वर्षी पूर्ण वसंत ऋतुत उशीरा आणि उन्हाळ्यात जेव्हा भरपूर पावसाचा काळ असतो तेव्हाच गंभीर नुकसान का होते. झाडे ताणाला जास्त संवेदनशील होतात (उदा. गोठलेले दव) आणि फुले तसेच पानांचे उत्पादन किमान दोन वर्षे लागोपाठ कमी होते.


प्रतिबंधक उपाय

  • ह्या पिकासाठी उपलब्ध असल्यास जास्त प्रतिकारक वाण लावा.
  • ज्या जागी थेट सुर्यप्रकाश आणि हवा चांगली खेळती असेल ती लागवडीसाठी निवडा.
  • सुर्यप्रकाश चांगला आतपर्यंत पोचण्यासाठी आणि हवा चांगली खेळण्यासाठी योग्य प्रकारे छाटणी करा.
  • संतुलित पोषके पुरविण्यासाठी रोपांना शक्तिवर्धके द्या.
  • शेतातुन पाण्याचा चांगला निचरा होऊ द्या.
  • पाने पूर्ण उमलल्यानंतर रोगाच्या लक्षणांसाठी रोपांचे निरीक्षण करा.
  • शरद ऋतुत उशीरा गळलेली पाने जमा करुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा