Wilsonomyces carpophilus
बुरशी
सुरवातीची लक्षणे वसंत ऋतुत दिसतात आणि वैशिष्ट्ये जांभळट किंवा लालसर डाग नविन पानांवर आणि क्वचित फुटव्यांवर आणि कळ्यांवर दिसणे अशी असतात. ह्या डागांभोवती बहुधा फिकट हिरवी किंवा पिवळी किनार असते. जसे ते मोठे होतात त्यांची केंद्रे आधी तपकिरी किंवा लालसर तपकिरी होतात आणि नंतर ती सुकुन गळतात, ज्यामुळे त्या भागात विशिष्ट 'शॉट होल' परिणाम दिसतो, म्हणुन रोगाचे हे सामान्य नाव आहे. अकाली पानगळ होऊ शकते. फांद्यावरील कळ्या मरतात, चिकट स्त्राव गळणारे कँकर्स किंवा डाग येतात. फळांवर वरच्या बाजुच्या पृष्ठभागावर खडबडीत आणि बुचासारखे जांभळ्या किनारीचे डाग येतात. ह्यामुळे फळ विद्रुप होते आणि विक्रीयोग्य नसते. ह्या डागांच्या मध्यावर भिंगाच्या सहाय्याने सूक्ष्म काळे ठिपके पाहिले जाऊ शकतात.
हिवाळ्याच्या सुरवातीला कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांचे फवारे मारणे हा ह्या रोगाविरुद्धचा पहिला बचाव असु शकतो. घरगुती बोरडॉक्स मिश्रण किंवा बाजारातील कॉपरची द्रावणे खरेदी केली जाऊ शकतात. पानगळ झटपट होण्यासाठी आणि नविन हंगामात बुरशीची उपस्थिती कमी करण्यासाठी शरद ऋतुत उशीरा झिंक सल्फेटचे फवारे पानांवर मारले जाऊ शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फळांना सुरक्षित ठेवण्यासाठी, फुलधारणेच्या आधी आणि नंतर म्हणजे कळ्या लागायला सुरवात झाल्यापासुन ते पाकळ्या गळेपर्यंत बुरशीनाशकांचे फवारे मारले जाऊ शकतात. फुलधारणेच्या काळातील हवामानवृत्ताप्रमाणे फळांचे रक्षण करण्यासाठी फवार्यांची गरज आहे कि नाही हे समजेल. ह्या टप्प्यावर कॉपरचा वापर शिफारशीत नसल्याने, थिराम, झिराम, अॅझोक्सिस्ट्रोबिन, क्लोरोथॅलोनिल, आयप्रोडियॉनवर आधारीत बुरशीनाशकांची शिफारस केली जाते.
विलसोनोमायसेस कार्पफिलस नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी स्टोन फळांच्या (टणक बियांची फळे, उदा. चेरी, पीच, बदाम आणि अॅप्रिकॉट) पुष्कळ जातींना संक्रमित करते. इंग्लिश लॉरेल आणि पीचवर्गीय झाडे यांचे पर्यायी यजमान आहेत. डागांत, कळ्यांत, काटक्यांत किंवा ममीफाइड फळात बुरशी विश्रांती घेते. जेव्हा हवामान परिस्थिती अनुकूल असते तेव्हा त्यांची वाढ परत सुरु होते आणि बीजाणू तयार केले जातात ज्यांचा प्रसार पावसाच्या उडणार्या पाण्याने निरोगी भागांवर होतो. पाने जास्त काळ (१४-२४ तास किंवा जास्त) ओली रहाणे आणि तापमान सुमारे २२ अंश असल्यास बुरशीच्या जीवनचक्राला चांगला मानवते आणि त्यांची निरोगी झाडांवर संक्रमण करण्याची संभवता वाढते. ऊबदार, धुके असणारे किंवा पावसाळी हिवाळे आणि वसंत ॠतुतील जास्त पावसाने बीजाणू तयार होणे आणि प्रसारीत होण्यास बढावा मिळतो. हा रोग फक्त स्टोन फळांच्या झाडांवरच विकसित होतो आणि तो ही फक्त वसंत ऋतुतील सहसा न असणार्या ओल्या हवेत.