Monilinia fructigena
बुरशी
झाडाच्या जातीप्रमाणे लक्षणे बदलतात पण सहसा फुलांवरील करपा, काटकीवरील कँकर आणि फळांवर तपकिरी कूज अशीच असतात. संक्रमित फुले मरगळतात तपकिरी होतात आणि काटकीलाच लोंबकळत रहातात. सुकलेले कँकर लाकडी भागात दिसतात. आर्द्र किंवा दमट परिस्थितीत, राखाडी तपकिरी बीजाणूंचे तुरे रोगट फुलांवर आणि काटक्यांवर दिसतात. कँकर्समधुन बहुधा चिकट स्त्राव गळतो, ज्यामुळे करपलेली फुले काटकीलाच चिकटुन रहातात. फळे पिकायच्या शेवटच्या टप्प्यावर तपकिरी कुजीला संवेदनशील असतात, काढणीच्या सुमारे २-३ अठवडे आधी. सुरवातीला गव्हाळ तपकिरी, गोल डाग सालीवर येतात. आर्द्र परिस्थितीत राखाडी तपकिरी बिजाणूंचे पुंजके ह्या डागात तयार होतात. रोगट फळे जी गळत नाहीत ती सुकतात आणि आक्रसतात आणि "ममीज" होऊन फांदीलाच लटकुन रहातात.
फळे संरक्षणाच्या पद्धतीस हायड्रो-कुलिंग म्हणतात, ज्यात काढणी केलेल्या ताज्या फळातील आणि भाज्यांतील उष्णता, त्यांना बर्फाच्या पाण्यात घालुन काढली जाते, ज्यामुळे बुरशीची वाढ साठवणीच्या किंवा वहनाच्या काळात होत नाही. बॅसिलस सबटिलिसवर आधारीत जैव बुरशीनाशके मोनिलिनिया फ्रुक्टिजेनाचे विरोधक म्हणुन काम करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. डायकार्बोक्सिमाइडस, बेन्झिमिडाझोलस, ट्रिफोरिन, क्लोरोथॅलोनिल, मायक्लोब्युटानिल, फेनब्युकोनॅझोल, प्रोपिकोनाझोल, फेनहेक्झामिड आणि अॅनिलिनोपायरिमिडाइनसवर आधारीत बुरशीनाशकांचे वेळेत आणि वारंवार वापर ह्या रोपाच्या उपचारांसाठी परिणामकारक आहेत. पायराक्लोस्ट्रोबिन आणि बोस्कॅलिडसारखी नविन बुरशीनाशकेही परिणामकारक आहेत. योग्य फवारणी त्याच वेळी होणार्या इतर रोगांवर जसे कि खपली, पावडरी मिल्ड्यु, तांबेरा, रसेट स्कॅब किंवा राखाडी बुरशी यांच्या घटनेवर अवलंबुन आहे. फळांना जखमा होऊ नयेत म्हणुन किड्यांचे नियंत्रणही महत्वाचे आहे.
मोनिलिनिया फ्रुक्टिजेना नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी ऊबदार, आर्द्र हवामानात फोफावते. काही वेळा इतर बुरशीही सम्मिलीत असु शकते. सगळ्याच वेळी ती ममिफाइड फळात किंवा फुटव्यात सुप्तावस्थेत जाते. सुरवातीचे संक्रमण बीजाणू फुलांच्या परागकोषावर किंवा स्त्रीकेसरावर पडल्याने होते. बुरशीमग फुलांच्या आतील भागावर (फुलांची नलिका, अंडाशय आणि तुर्यांमध्ये) पसरत जाते आणि फुल लागलेल्या काटकीवर पोचते. फुले आणि काटक्यांवर हळुहळु करपा आणि कँकर्स क्रमश: येतात. बुरशीचे बीजाणू झाडाच्या इतर फांद्यांवर संक्रमणाचा प्रसार करण्यापूर्वी ममिफाइड फळात राहू शकतात. संक्रमित फळे आणि खास करुन ममीफाइड फळे संक्रमणाच्या अगणित स्त्रोतांचे प्रतिनिधीत्व करतात.