चेरी

तपकिरी कूज

Monilinia laxa

बुरशी

थोडक्यात

  • संक्रमित फुले मरगळतात, तपकिरी होतात आणि सहसा चिकट पदार्थाने फांदीला चिकटतात.
  • मऊ तपकिरी भाग फळांवर दिसतात आणि पांढर्‍या किंवा पिवळ्या फोड्या त्यात वाढतात.
  • फळांतुन आर्द्रता कमी होते आणि झाडाला लटकुन ममीफाइड होतात.
  • साठवणीतील फळे पूर्ण काळी होऊ शकतात.

मध्ये देखील मिळू शकते

7 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
चेरी
अधिक

चेरी

लक्षणे

पीकाप्रमाणे लक्षणे बदलतात आणि प्रामुख्याने फुलांवरील करपा आणि फळांवरील कुजीचा टप्पा हे वैशिष्ट्य आहे. फुलांवरील करप्याचे पहिले लक्षण आहे फुले सुकुन तपकिरी होतात आणि सहसा चिकट पदार्थाने फांदीलाच चिकटुन रहातात. संक्रमण काटकीत शिरुन तिला वेढते. जर फुटवे पूर्णपणे मेले नाहीत तर संक्रमण फुलांपासुन नविन विकसित होणार्‍या पानांवर आणि फळांवर जाते. पाने सुकतात पण पूर्ण वर्षभर झाडावरच रहातात. फळ कुजीचा प्रभाव झाडावर लटकणार्‍या किंवा साठवणीतल्या फळांवरही पडतो. मऊ, तपकिरी डाग फळांवर येतात. जसे हे डाग वाढतात, पांढर्‍या किंवा पिवळ्या फोड्या गव्हाळ भागात दिसतात, काही वेळा केंद्रित वर्तुळेही दिसतात. फळातुन हळुहळु आर्द्रता कमी होते, कुजतात आणि झाडावरच ममिफाय होतात. साठवणीतल्या फळांवर फोड्या विकसित होत नाहीत आणि ती पूर्णपणे काळी पडु शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

फळ कूज टप्प्याचे नियंत्रण करण्यासाठी जखमा करणार्‍या घटकांचा नायनाट करणे हा सगळ्यात परिणामकारक उपाय आहे. वाहक किड्यांचे आणि पक्षांचे किंवा जे फळांना जखमा करतात त्यांच्या नियंत्रण केल्याने रोगाच्या घटना कमी होतात, हा एक मार्ग आहे. पक्षांचे नियंत्रण बुजगावणे लावुन केले जाऊ शकते. वॅस्पसची घरटी शोधुन नष्ट करा. फळांची बांधणी आणि साठवणी करताना खासकरुन काळजी घ्यायला हवी कारण बुरशी फळां-फळांतुन पसरु शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या रोगास चेरी किमान संवेदनशील आहे आणि जोपर्यंत हवामान संक्रमणास खासकरुन अनुकूल नाही किंवा बागेत ह्या रोगाचा इतिहास नाही तोपर्यंत प्रतिबंधक फवार्‍यांचीही गरज भासत नाही. डिफेनोकोनाझोल आणि फेनहेक्झामिडवर अाधारीत दोन्ही पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर परिणामकारक असतो. संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यावर बुरशीचा नायनाट करणे शक्य नाही. गारपीटीसारख्या विपरित हवामानानंतर प्रतिबंधक बुरशीनाशकांचा वापर करा. मोनिला लाक्साचे संक्रमण जखमांतुन होत असल्याकारणाने किड्यांच्या बंदोबस्ताचा विचार करणे महत्वाचे आहे.

कशामुळे झाले

मोनिलिया लाक्सा पुष्कळ यजमानांना खासकरुन बदाम, अॅप्रिकॉट, चेरी, पीच, पेयर, प्लम किंवा क्विन्स सारख्या स्टोन फळांना संक्रमित करु शकते. ही बुरशी कोरड्या पानात किंवा झाडावरुन लटकणार्‍या ममिफाइड फळांमध्ये विश्रांती घेते आणि तिचे बीजाणू वार्‍याने, पाण्याने किंवा किड्यांद्वारे प्रसारित होतात. फळांवरील जखमा (पक्षांमुळे, किड्यांमुळे झालेल्या) किंवा संक्रमित भागाचा निरोगी भागाशी झालेला संपर्क हे बुरशीला अनुकूल आहे. फुले येण्याच्या काळात जर उच्च आर्द्रता, पाऊस किंवा दव आणि मध्यम तापमान (१५ ते २५ डिग्री सेल्शियस) असेल तर ती संक्रमण प्रक्रियेस अनुकूल आहे फळांवरील लक्षणे उन्हाळ्याच्या मध्यानंतर दिसु लागतात, झाडावर असताना किंवा साठवणीत. साठवणीतील फळे पूर्ण काळी पडतात आणि त्यावर फोड्या येत नाहीत. बागेत किंवा साठवणीत प्रसाराची जोखीम उच्च असल्याने, भरपूर नुकसान अपेक्षित असते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन रोपाचे निरोगी साहित्य घ्या.
  • योग्य सिंचनाबरोबर चांगली खत योजना करा.
  • पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या आणि शेतात हवा चांगली खेळती राहू द्या.
  • पक्षांनी नुकसान करु नये म्हणुन जाळ्यांचा वापर करा.
  • बागेचे नियमित निरीक्षण करुन नुकसानित फांद्या किंवा ममिफाइड फळे काढुन नष्ट करा.
  • झाडीची छाटणी उशीरा पण हवा चांगली खेळती राहील अशी करण्याची शिफारस करण्यात येते.
  • खोल नांगरुन रोपाचे अवशेष पृष्ठभागाखाली गाडा.
  • साठवणीची जागा स्वच्छ आहे याची काळजी घ्या.
  • चेरीजना स्वच्छ कोरड्या खोलीत सुमारे ५ डिग्री सेल्शियस तापमानात साठवा.
  • काढणी करताना फळांचे देठ तुटणार नाहीत याची काळजी घ्या.
  • एकुण चांगली स्वच्छता राखल्यास संक्रमणाचा संभव कमी होतो.
  • साठवणीतल्या फळांना वेळोवेळी तपासा आणि खराब झालेली फळे नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा