पेयर

पेयरवरील युरोपियन तांबेरा

Gymnosporangium sabinae

बुरशी

थोडक्यात

  • पानाच्या खालच्या बाजुला गडद नारंगी-लाल, गोलाकार ठिपके येतात.
  • तपकिरीसर आणि गाठीसारखी वाढ पानांच्या खालच्या बाजुला विकसित होते.
  • क्वचित खोलगट व्रण फांदीच्या सालीवर आणि कोवळ्या खोडांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
पेयर

पेयर

लक्षणे

छोटे, तपकिरी, गोलाकार ठिपके प्रथम पानांच्या वरच्या बाजुला येतात. जसे ते मोठे होतात तसा त्याचा रंग गडद नारंगी-लाल होऊन केंद्र गडद तपकिरी होते. उन्हाळ्यात उशीरा दाण्याच्या आकाराच्या, तपकिरीसर गाठीसारखी वाढ पानाच्या खालच्या बाजुला दिसते. क्वचितच, बुरशीमुळे व्रण आणि दबलेले व्रण फांद्यांच्या सालीवर आणि कोवळ्या खोडांवर दिसतात. जरी फळांवर थेट परिणाम होत नसला तरी गंभीर संक्रमणामुळे पानगळ आणि पिकाचे नुकसान होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

आजपर्यंत ह्या रोगावर कोणतेही जैविक उपचार माहितीत नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कमी प्रमाणाचे संक्रमण हे बहुधा समस्या ठरत नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. डायफेनोकोनाझोलवर आधारीत बुरशीनाशकांचा वापर करुन रोगाचे नियंत्रण केले जाऊ शकते. घरातील बागांसाठी टेब्युकोनाझोल, टेब्युकोनाझोलसह ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन, आणि ट्रायटिकोनाझोल हे तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मान्य आहेत.

कशामुळे झाले

जिम्नोस्पोरांगियम साबेने नावाच्या बुरशीमुळे लक्षणे उद्भवतात, जी पियर आणि ज्युनिपर्स दोन्ही झाडांवर हल्ला करते. पियर्स हे जंतुंसाठी फक्त मधल्या काळाचे यजमान आहेत आणि त्यांचे जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी खरतर दोन्ही झाडे आवश्यक आहेत. हे झाडाच्या मृत अवशेषांवर जगु शकत नाही म्हणुनच हे दोन यजमानात आलटुन-पालटुन रहातात. बुरशी ज्युनिपर्समध्ये विश्रांती घेते, जे त्यांचे प्रमुख यजमान असतात. वसंत ऋतुत बीजाणूंचा प्रसार ज्युनिपरवरुन पियरच्या पानांच्या खालच्या बाजुला होतो, जे खरतर बीजाणू उत्पादनाच्या रचना असतात. हे बीजाणू पियरच्या पानांना संक्रमित करु शकत नाहीत म्हणुन उन्हाळ्याच्या शेवटी नविन ज्युनिपरला संक्रमित करण्यासाठी ते सुदूर अंतरापर्यंत (५०० मी. पर्यंत) विखुरतात. तिथे हे फांद्यांना बारमाही शिंगांसारखी सूज देतात. नंतरच्या उच्च आर्द्रतेच्या काळात ही वाढ खासकरुन वसंत ऋतुत जास्त स्पष्ट दिसते.


प्रतिबंधक उपाय

  • ज्युनिपर्सवरील बुरशीची रचना काळजीपूर्वक छाटा.
  • पर्यायाने जवळपास असणारी ज्युनिपरची झाडे काढा.
  • आपल्या पियर च्या झाडास एकुणच ताकद देण्यासाठी पोषक वापरा.
  • पियरवरील फक्त एकेकटे पान नसून संपूर्ण संक्रमित फांदी दिसताक्षणीच छाटा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा