सफरचंद

सफरचंदवरील खपली

Venturia inaequalis

बुरशी

थोडक्यात

  • पानांवर अतिशय छोटे गडद हिरव्या रंगाचे ठिपके येतात.
  • नंतर सुकलेल्या मोठ्या डागात बदलतात.
  • पाने बहुधा विकृत असतात आणि अकाली गळतात.
  • गडद तपकिरी, उंचावलेले, कडक आणि बुचासारखे भाग फळांवर दिसतात.
  • फळे विकृत आकाराची होतात आणि फुटतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

सफरचंद

लक्षणे

सफरचंदवरील खपलीची पहिली दृष्य लक्षणे वसंत ऋतुत, अतिशय बारीक, गोलाकार, गडद हिरवे ठिपके पानांवर मध्यशिरेच्या बाजुने दिसणे ही असतात. जसे ते ठिपके मोठे होतात ते तपकिरीसर काळे होतात आणि अखेरीस एकमेकांत मिसळुन मोठे सुकलेल्या भागांचे डाग तयार करतात. प्रभावित पाने बहुधा विकृत असतात आणि अकाली गळतात ज्यामुळे संक्रमण गंभीर असल्यास पानगळ होते. फुटव्यांवर संक्रमणामुळे फोड येणे किंवा फुटव्याला चिरा जाणे होते ज्यातुन संधीसाधू जंतु शिरकाव करतात. फळांवर तपकिरी ते गडद तपकिरी गोलाकार भाग पृष्ठभागावर येतात. जसे ते वाढतात, ते एकमेकांत मिसळुन उंचावलेली, कडक आणि बुचासारखी खपली तयार करतात. ह्यामुळे फळांची वाढ खुंटते आणि फळे विकृत होतात तसेच त्यांची साल फाटुन आतील गर उघडा पडतो. कमी संक्रमणाने फळांच्या प्रतीवर जास्त प्रभाव पडत नाही. तरीपण खपलीमुळे फळांत संधीसाधू जंतु आणि कूज शिरु शकते ज्यामुळे साठवण क्षमता आणि प्रत फारच कमी भरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जर आधीच्या हंगामात रोगाची पातळी जास्त असेल तर द्रव रुपातील कॉपर बुरशीनाशकांचे फवारे थंडीच्या काळात झाडावर बुरशीची वाढ थांबविण्यासाठी फवारावेत. गंधकाचे फवारे सफरचंदावरील खपलीसाठी पूर्णपणे परिणामकारक नसतात. तरीपण गंधक आणि पायरेथ्रिन असणारी द्रावणे वाढीच्या काळात रोगाचे सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी उपलब्ध आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. डोडाइन, कप्तान किंवा डायनॅथियनसारखी सुरक्षात्मक बुरशीनाशके कळ्या येण्याच्या सुमारास रोग टाळण्यासाठी फवारावीत. एकदा का खपली दिसु लागली की मग डायफेनोकोनाझोल, मायक्लोब्युटानिल किंवा गंधकावर आधारीत बुरशीनाशके बुरशीची वाढ होण्यापासुन रोखण्यासाठी वापरावीत. प्रतिकार निर्माण न होण्यासाठी बुरशीनाशके विविध रसायनिक गटातील असण्याची काळजी घ्या.

कशामुळे झाले

व्हेंच्युरिया इनाइक्वालिस नावाच्या बुरशीमुळे सफरचंदावरील खपलीचा रोग होतो. थंडीचा काळ हे जमिनीवरील संक्रमित पानांवर काढतात पण कळीच्या कोषांवर किंवा लाकडाच्या व्रणांमध्येही रहातात. वसंत ऋतुच्या सुरवातीला बुरशीची वाढ परत सुरु होते आणि बिजाणू तयार करते जे नंतर वार्‍याने लांब अंतरापर्यंत पोचतात. हे बीजाणू विकसित होणार्‍या पानांवर आणि फळांवर पडुन नविन संक्रमण सुरु करतात. फळे धरणार्‍या कळीचा बाहेरील भाग खपलीस जास्तच संवेदनशील असतो. तरीपण, जसे फळ मोठे होते तसे ते कमी संवेदनशील होते. आर्द्र हवामानात, पाने किंवा फळे ओली रहाण्याचा काळ हा संक्रमणासाठी जरुरी असतो. कोटोनिस्टर, पायराकांथा आणि सोरबस जातीची झुडपे ह्यांच्या पर्यायी यजमानात येतात. सफरचंदाच्या सगळ्या जाती खपलीला संवेदनशील आहेत आणि गालाचे वाण जास्तच संवेदनशील आहे.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील किंवा प्रतिकारक वाण लावा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे निरीक्षण करा.
  • प्रभावित पाने, फुटवे आणि फळे काढुन टाका.
  • काढणी केल्यानंतर झाडाच्या सभोवतालचा सर्व पालापाचोळा काढुन टाका.
  • किंवा शरद ऋतुत ह्याच पाचोळ्यावर ५% युरिया देऊन त्यांचे कुजणे लवकर होऊ द्या आणि बुरशीचे जीवनचक्र खंडित करा.
  • जास्तीचा पालापाचोळा बारीक चिरुनही कुजणे लवकर घडवुन आणले जाऊ शकते.
  • हवा जास्त चांगली खेळेल अशी छाटणी करा.
  • पाणी संध्याकाळी किंवा सकाळी लवकर द्या आणि फवारा सिंचन टाळा.
  • पाणी देताना झाडी ओली होणार नाही याची काळजी घ्या.
  • पानगळीनंतर जमिनीचा सामू वाढविण्यासाठी लाइम करा.
  • झाडाखाली आच्छादन घाला पण त्याला खोडापासुन दूर ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा