बाजरी

बाजरीवरील गोसावी (केवडा) रोग

Sclerospora graminicola

बुरशी

थोडक्यात

  • कणसामध्यें दाण्याच्या जागीं पानांची रचना दिसते.
  • पानांच्या खालील बाजूस पांढर्‍या बुरशीची वाढ होते.
  • पानांवर पिवळे धब्बे येतात.
  • कणसात उत्पादन होत नाही.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बाजरी

लक्षणे

गोसावीची लक्षणे विविध प्रकारची असु शकतात. फुलांचा भाग पानासारख्या रचनेत बदलत असल्याने ह्या रोगाला हिरव्या कानाचा रोग असेही म्हणतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

संक्रमित झाडे दिसताक्षणी उपटून टाकावी.

रासायनिक नियंत्रण

बियाणातुन होणारा संसर्ग टाळण्यासाठी कॅप्टान, फ्ल्युडियोक्झोनिल, मेटालॅक्झिल/मेफेनोक्झॅम किंवा थायरमनी बीज प्रक्रिया करावी. गोसावी रोगाचे थेट नियंत्रण करण्यासाठी मेटालॅक्झिल/मेफेनोक्झॅम सारखी बुरशीनाशके वापरली जाऊ शकतात.

कशामुळे झाले

गोसावी बुरशीचे बीजाणू जमिनीत, पिकाच्या संक्रमित अवशेषात आणि बियात जिवंत रहातात. जमिनीत बीजाणूचे वहन पाण्याद्वारे व जमिनीवर वाऱ्यामुळे होत असते.


प्रतिबंधक उपाय

  • नियमितपणे बुरशीनाशकांनी बीज प्रक्रिया करावी.
  • रोग प्रतिकारक वाणांची निवड करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा