काळजी
तण आणि किडींची तीव्रता कमी करण्यासाठी पेरणीपूर्वी शेताची नांगरणी करावी. जमिनीची मशागत केल्याने उगवण क्षमता वाढते, जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीची धूप देखील कमी होते. ज्वारी दवास संवेदनशील असल्याने शेवटचे दव पडल्यानंतरच याची पेरणी करावी. शिवाय, बियाणे उगवण्यासाठी विशिष्ट प्रमाणात ओलावा आवश्यक आहे. पेरणीच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास उगवण क्षमता खालावते.
माती
ज्वारी या जोमदार प्रमुख पीकाची लागवड मुख्यत: उथळ, चिकणमाती असणार्या जमिनीत केली जाते पण ही जास्त वाळुदार जमिनीत देखील तग धरते. सामूच्या विस्तृत विविधतेला ही सहन करते आणि अल्कधर्मी जमिनीतही जगते. झाडांना पाणी साचणेही सहन होते तसेच दुष्काळ देखील काही प्रमाणात सहन होतो पण याची उत्तम वाढ मात्र चांगला निचरा असलेल्या जमिनीत उत्तम होते.
हवामान
ज्वारी ऊबदार हवामानात जिथे दिवसाचे तापमान २७-३० अंश असते त्या भागात उत्तम वाढते. जर ह्याची मुळे चांगली विकसित झालेली असली तर ह्यास दुष्काळही सुप्तावस्थेत जाऊन सहन करता येतो आणि नंतर अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यास परत वाढ सुरु करते. उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय प्रदेशात ज्वारीची लागवड समुद्रसपाटीपासुन २३०० मी. उंचीपर्यंत केली जाऊ शकते. वाणाप्रमाणे पाण्याची गरज बदलत असते पण बहुधा मक्यापेक्षा पाणी देखील कमीच लागते.