काळजी
बटाटा मूळतः दक्षिण अमेरिकेतील अँडीजचा आहे. बटाट्याची लागवड भारतात सुमारे ३०० वर्षापासून केली जात आहे आणि हे इथले सर्वात लोकप्रिय पिकांपैकी एक झाले आहे. बटाट्यांना त्यांच्या खाद्य कंदांसाठी लावले जाते जे किफायतशीर खाद्य असुन मानवांना स्वस्त ऊर्जा स्त्रोत पुरविते. बटाट्यात पिष्टमय पदार्थ, व्हिटॅमिन्स (सी आणि बी १), आणि खनिज असल्याने ते पौष्टिकरित्या समृद्ध असतात. बटाट्यांना स्टार्च आणि मद्य बनविण्याच्या औद्योगिक हेतुंसाठीही वापरले जाते.
माती
बटाट्याची लागवड क्षारपट आणि अल्क जमिनी सोडुन कोणत्याही प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. जिथली माती नैसर्गिकपणे सैल आहे आणि कंद वाढीसाठी किमान प्रतिकार करते तिला प्राधान्य दिले जाते. मध्यम आणि वालुकामय जमिनी ज्यात भरपूर सेंद्रीय घटक, उत्तम निचरा आणि जमिनीत चांगली हवा देखील खेळती आहे त्या जमिनी बटाटा लागवडीसाठी सर्वात योग्य आहेत. ५.२-६.४ सामू असलेल्या जमिनी लागवडीसाठी आदर्श मानले जातात.
हवामान
बटाटा हे समशीतोष्ण हवामातील पीक आहे पण तरीही हे विविध श्रेणीच्या हवामान परिस्थितीत वाढते. जिथे वाढीच्या हंगामात हवामान मध्यम थंड असते तिथेच याची लागवड केली जाते. जर तापमान २४ अंश असेल तर झाडाची पालवी वाढ उत्तम होते तर कंद वाढीसाठी २० अंश तापमान चांगले असते. म्हणुन बटाट्याला डोंगराळ प्रदेशात उन्हाळी पीक म्हणुन घेतले जाते आणि उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय प्रदेशात याला हिवाळी पीक म्हणुन घेतले जाते. या पिकाची लागवड समुद्रसपाटीपासुन ३००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात केली जाऊ शकते.